IMPIMP

Pune Crime | अशीही जबरी चोरी ! प्रवाशाला मारहाण करुन जबरदस्तीने Google Pay वरुन पैसे घेतले ट्रान्सफर करुन लुटले

by nagesh
Pune Crime | Chain Snatching In Vishrantwadi Chowk Yerwada Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | नागरिक आता स्वत:जवळ अधिक पैसे ठेवत नाही. त्याऐवजी ते ऑनलाईन पेमेंट (Online Payment) करतात. त्यामुळे रस्त्यात अडवून लोकांना लुटणार्‍या चोरट्यांची अडचण होऊ लागली आहे. त्यावर दोघा चोरट्यांनी चक्क प्रवाशाला मारहाण करुन त्याच्याकडून Google Pay वर पैसे ट्रान्सफर (G – Pay Transfer) करुन एका प्रवाशाला लुटले. हा प्रकार स्वारगेट एस टी स्टँड (Swargate ST Stand) ते मुकुंदनगर (Mukund Nagar) दरम्यान घडला. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी रोहित ईश्वर पवार (वय २७, रा. रायगड) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित पवार हे मुळ गावी जाण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकरा वाजता खासगी गाडीचा स्वारगेट एस टी स्टँडच्या बाहेर शोध घेत होते. इनगेटच्या बाहेर ते थांबले असताना दोघे जण मोटारसायकलवरुन आले. त्यांनी पवार यांना जबरदस्ती करुन मारहाण केली. (Pune Crime)

 

त्यांना मोटारसायकलवर बसवून मुकुंदनगर येथील सत्यम – शिवम बंगल्यासमोर आणले. तेथे त्यांच्या मोबाईलवरील गुगल पे अ‍ॅप (Google Pay App) ओपन करुन पासवर्ड सांगण्यात भाग पाडले. त्यानंतर त्यांच्याकडून प्रथम ५ हजार रुपये व नंतर ६० हजार रुपये व शेवटी २ हजार रुपये असे एकूण ६७ हजार रुपये ट्रान्सफर (Money Transfer) करुन घेतले. पवार यांना मारहाण करुन मोटारसायकलवरुन पळून गेले. या प्रकाराने फिर्यादी घाबरुन गेले. तसेच त्यांचे वडिलांची तब्येत ठीक नसल्याने ते काल पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी आले. पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Such a forcible theft Passengers were beaten and forcibly taken from Google Pay and transferred

 

हे देखील वाचा :

Income Tax Saving | इन्कम टॅक्स वाचवणारी ‘ही’ 2 साधने रिटर्नही देतात भरपूर, जाणून घ्या याबाबत

Pune Corporation | महिलांच्या आरोग्याबाबत पुणे महापालिका आणि सत्ताधारीही उदासिन ! सॅनेटरी नॅपकिन वेंडींग मशीनचा ‘स्मार्ट मैत्रीण’ प्रकल्प वर्षभरापासून बंद

Pune Crime | धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ! समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष पुण्यात मिलिंद एकबोटे यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल

 

Related Posts