IMPIMP

Pune Crime | दौंड तालुक्यात महाविद्यालयीन तरुणाची आत्महत्या, काही दिवसांपूर्वी प्रेमप्रकरणातून झाली होती मारहाण

by nagesh
Pune Crime News | Hadapsar Police Station - Youth commits suicide due to harassment by wife and in-laws; Wife grabbed the house, place through fake documents

पुणेसरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | दौंड तालुक्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने राहत्या घरी गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केल्याचा (Suicide) प्रकार घडला आहे. सोमनाथ बाळू वेताळ Somnath Balu Vetal (वय 17, रा. रोटी, ता. दौंड, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. वेताळ कुटुंबीय रोटी गावातील धुमाळ वस्ती परिसरात राहायला (Pune Crime) आहेत. सोमनाथची आई दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त पुण्याला गेली होती. त्यावेळी सोमनाथने आत्महत्या केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सोमनाथच्या आईने सोमनाथच्या मोबाईलवर संपर्क साधला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याच्या आईने शेजाऱ्यांकडे सोमनाथची चौकशी केली आणि तो फोन घेत नसल्याची माहिती दिली. सायंकाळी सोमनाथची आई घरी परतली. तेव्हा सोमनाथने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

 

सोमनाथच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. सोमनाथने मृत्यूपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिलेले नाही.
काही दिवसांपूर्वी त्याला प्रेमप्रकरणातून (Love Affair) मारहाण करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी
पोलिसांना चौकशीदरम्यान दिली. वरवंड मधील एका महाविद्यालयात सोमनाथ अकरावीत शिकत होता.
या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | suicide of college youth in daund taluka

 

हे देखील वाचा :

Nora Fatehi | फिफा वर्ल्ड कपमधील नोरा फतेहीचा ‘तो’ डान्स व्हिडिओ वायरल

Pune Crime | पुण्यात रात्रगस्तीवर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी, पुण्यातील घोरपडे पेठेतील घटना

Winter Session -2022 | ‘तुम्हाला मंत्रीपद हवं आहे का?’ देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे गटाच्या आमदाराला ऑफर

Winter Session 2022 | राज्यमंत्र्यांचे बंगले सजावटीवरून सुनिल प्रभुंच्या प्रश्नाला फडणवीसांचे मिश्किल शैलीत उत्तर. म्हणाले…..

 

Related Posts