IMPIMP

Pune Crime | डॉक्टर पत्नीचे सोशल मीडियावर अकाऊंट तयार करुन पतीनेच केली बदनामी

by nagesh
Pune Crime | Obscene text on social media against police, FIR against 9 people

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | डॉक्टर असलेल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिचे व तिच्या आईचे सोशल मीडियावर बनावट अकाऊंट (Fake Social Media Account) तयार करुन त्यावर बदनामीकारक मजूकर टाकून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी एका २८ वर्षाच्या डॉक्टर महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७८५/२२) दिली आहे. पोलिसांनी संगमनेर (Sangamner) येथील फिर्यादीच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १९ जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत सुरु आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा संगमनेर येथील एकाशी विवाह झाला.
विवाहानंतर पती हा फिर्यादी यांचे बाहेरील लोकांबरोबर अफेअर आहे, असे बोलून त्यांच्यावर संशय व्यक्त करीत होता.
फिर्यादी यांनी काम सोडले नाही तर मारुन टाकण्याची धमकी फिर्यादी यांच्या मैत्रिणीजवळ बोलून दाखविली होती.
या त्रासाला कंटाळून फिर्यादी या काही महिन्यातच माहेरी परत निघून आल्या.
किशोर याने फिर्यादी व फिर्यादी यांच्या आईचे फेसबुकवर बनावट अकाऊंट (Fake FB Account) तयार केले.
त्यावर फोटो अपलोड करुन त्यांच्याविषयी चुकीचा मजकूर टाकून बदनामी केली.
याची माहिती फिर्यादी यांना मिळाल्यानंतर त्यांनी आता पोलिसांकडे तक्रार केली असून
पोलीस निरीक्षक विजय पुराणिक (Police Inspector Vijay Puranik) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | The husband defamed the doctor’s wife by creating an account on social media Sangamner Bharti Vidyapeeth Police Station

 

हे देखील वाचा :

Shraddha Walkar Murder Case | ‘चौकशी दडपण्यात आली का?’ भाजपचे नेते आशिष शेलार यांचा श्रद्धाच्या जुन्या तक्रारीवर चौकशीची मागणी; तत्कालीन सरकारवरही आरोप

Jalna ACB Trap | जमीन नावावर करुन देण्यासाठी 10 हजाराची लाच घेणारा तलाठी लाच लुचपत विभागाच्या ताब्यात

Devendra Fadnavis On Shraddha Walker Murder Case | ‘… तर श्रद्धाचा जीव वाचला असता’ – देवेंद्र फडणवीस

 

Related Posts