IMPIMP

Pune Crime | पुण्यात दुचाकीस्वार मोबाईल चोरांचा धुमाकूळ ! हडपसर, बिबवेवाडी, वानवडी परिसरात महागडे मोबाईल हिसकावले

by nagesh
pune crime | pune police crime branch arrest criminal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरातील (Pune Crime) वेगवेगळ्या भागामध्ये दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दुचाकीवरुन आलेले चोरटे रस्त्यावरुन पायी जाणाऱ्या नागरिकांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवतात. त्यानंतर त्यांच्या हातातील महागडे मोबाईल घेऊन पसार (mobile theft) होतात. अशा प्रकारच्या घटना पुण्यामध्ये (Pune Crime) वाढत असल्याने महिला, पादचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा प्रकारच्या घटना घडत असताना हद्दीमधील बीट मार्शल (Beat Marshall) आणि पेट्रोलिंग (Patrolling) करणाऱ्या पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

गुरुवारी पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये टेम्पो चालक तरुणासह तीन महिलांच्या हातातील मोबाईल चोरट्यांनी जबरदस्तीने चोरुन नेले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अशा घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी (Pune Police) उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 

बिबवेवाडीमध्ये एका टेम्पो चालक तरुणाला चोरट्यांनी आडवले.
तुझे वय आहे का टेम्पो चालवायचे थांब तु असे बोलून टेम्पोच्या खिडकीतुन हात घालून 15 हजार रुपयांचा मोबाईल चोरुन नेला.
ही घटना शेळके वस्ती परिसरात 31 ऑगसट रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
याप्रकरणी 35 वर्षीय तरुणाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibwewadi police station) फिर्याद दिली आहे.

 

दुसरी घटना हडपसर येथील दत्त मंदीर कॉर्नर परिसरात घडली आहे. 22 ऑगस्ट रोजी रात्री 10 सुमारास रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेच्या हातातील 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने हिसकावून नेला.
याप्रकरणी 39 वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar police station) फिर्याद दिली आहे.

 

तिसऱ्या घटनेत 37 वर्षीय महिला त्यांची लहान मुलगी आणि नणंद यांच्यासोबत सोलापूर रोडने पायी जात होत्या.
त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने मुलीच्या हातातून 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला.
महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी रमेश नागेश माने (वय-19 रा. माळवाडी) या चोरट्याला अटक केली आहे.

 

चौथ्या घटनेत नातेवाईकांकडे जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करत दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या हातातील 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला.
हा प्रकार 24 ऑगस्टला संध्याकाळी साडेचारच्या सुमाास हांडेवाडी रस्त्यावरील (Handewadi Road) श्रीराम चौकाजवळ घडला आहे.
याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. शहरामध्ये मोबाईल हिसकावण्याच्या घटना वाढत असून बहुतांश प्रकरणामध्ये चोरट्यांकडून महिलांना टार्गेट केल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 

 

Web Title : Pune Crime | Two-wheeler mobile thieves rampant in Pune! Expensive mobiles snatched in Hadapsar, Bibwewadi, Wanwadi area

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime | पुण्यातील ज्येष्ठ महिलेला सीमकार्ड अपडेट करणे पडले 11 लाखांना, 4 परप्रांतियांवर FIR

 

 

 

Related Posts