IMPIMP

Pune Cyber Crime | पुण्यातील ज्येष्ठ महिलेला सीमकार्ड अपडेट करणे पडले 11 लाखांना, 4 परप्रांतियांवर FIR

by nagesh
Pune Cyber Crime | Senior woman in Pune had to update SIM card for Rs 11 lakh, FIR on 4 foreigners

पुणे : सरकारसत्ताऑनलाइन तुमच्या बीएसएनएल सीमकार्डची (BSNL Sim Card) मुदत संपली असून 24 तासात ते बंद पडणार आहे. सीमकार्ड सुरुच ठेवायचे असेल तर दिलेल्या क्रमांकावर फोन करा. सध्या ऑनलाईन अ‍ॅक्टिवेशन (Online activation) बंद असल्याने ऑफलाईन करावे लागेल, असे सांगून सायबर भामट्याने पुण्यातील (Pune Cyber Crime) एका ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर चोरट्याने तब्बल 10 लाख 85 हजारांचा ऑनलाईन गंडा (Pune Cyber Crime) घातला. हा प्रकार पुण्यात फेब्रुवारी 2021 मध्ये वानवडी परिसरात घडला आहे.

याप्रकरणी 57 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. महिलेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी लालसा देवी (रा. नवी दिल्ली), जयंता दे (रा. वेस्ट बंगाल), संतोष कुमार, अंबुनाथ टुटु, संजय कुमार यादा (रा. उत्तर प्रदेश) यांच्यावर फसवणूक (Cheating) आणि आयटी अॅक्ट (IT Act) अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या कुटुंबासमवेत वानवडी परिसरात राहात. 4 फेब्रुवारी रोजी त्यांना एकाने व्हॉट्सअ‍ॅवर बीएसएनएल कंपनीचा लोगो पाठवला.

मी कोथरुड (kothrud) बीएसएनएल कार्यालयातून बोलत असल्याचे खोटे सांगितले.
त्यानंतर चोरट्याने तुमचे सिम कार्ड बंद पडणार आहे.
सीमकार्ड सुरु ठेवायचे असल्यास दिलेल्या क्रमांकावर फोन करा.
सध्या ऑनलाइन अ‍ॅक्टिवेशन बंद असून ऑफलाईन (Offline activation) करावे लागेल असे सांगून, महिलेच्या बँक खात्याची माहिती चोरट्याने घेतली.

त्यानंतर सायबर चोरट्याने महिलेच्या आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) व एसबीआय बँकेच्या
(SBI) एटीएम कार्डचा आणि क्रेडीट कार्डचा सीव्हीसी क्रमांक (CVC number) घेतला.
त्यानंतर 10 लाख 85 हजारांचे ऑनलाईन ट्रानझेक्शन करुन महिलेला ऑनलाई गंडा घातला.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला.
महिलेच्या तक्रार अर्जाची चौकशी करुन वानवडी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक दीपक लगड (Senior Police Inspector Deepak Lagad) करीत आहेत.

 

Web Title : Pune Cyber Crime | Senior woman in Pune had to update SIM card for Rs 11 lakh, FIR on 4 foreigners

 

हे देखील वाचा :

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांचं नवं गाणं रिलीज (व्हिडीओ)

Pimpri Crime | थकीत घरभाडे मागण्यासाठी गेलेल्या घरमालकाच्या मुलाला चौथ्या मजल्यावरुन ढकललं, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Ajit Pawar | ‘राज्यात पुन्हा सगळं बंद करण्यास भाग पाडू नका, नियम पाळा’ – अजित पवार

 

Related Posts