IMPIMP

Pune Crime | हॉटेलमध्ये राडा घालत केली गाड्यांची तोडफोड; वारजे परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | Pune-Rasta Peth Crime News: Shopkeepers beaten up for extortion, four arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या ग्राहकाला कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने पैसे काढून घेत टोळक्याने गोंधळ घातला. तसेच परिसरातील सोसायट्यांमधील गाड्यांची तोडफोड (Vandalism of Vehicles) करून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना (Pune Crime) वारजे परिसरातील गणपती माथा येथील एका हॉटेलमध्ये व परिसरात शनिवारी (दि. 10) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रोहित जटल, अवि (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) व त्यांच्या इतर दोन साथीदारांवर वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) आयपीसी 392, 323, 504, 506(2) महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), आर्म अॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजकुमार आनंद मोरे (वय 39, रा. गोकुळनगर पठार, वारजे) यांनी रविवारी (दि.11) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गणपती माथा येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर हॉटेलच्या मॅनेजरला बिल देताना ते मॅनेजरसोबत बोलत होते. त्यावेळी फिर्यादी बसलेल्या टेबल जवळून जाणाऱ्या रोहित जटल याने आपल्याला बोलल्याचा गैरसमज करून घेतला. त्याने त्याच्या इतर तीन साथीदारांना बोलावून घेतले. आरोपीने फिर्यादी यांच्या कानाखाली मारून अवि याने कोयता काढून फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच त्याने कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी यांच्याकडे पैशांची मागणी केली.

 

फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपी रोहित याच्या इतर साथीदारांनी जबरदस्तीने फिर्यादी यांच्या खिशातील 700 रुपये काढून घेतले.
तसेच हॉटेल मॅनेजर, कामगार व हॉटेलमधील इतर नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून गोंधळ घालत निघून गेले.
हॉटेलमधून जाताना आरोपींनी परिसरातील सोसायट्यांमध्ये पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड करून परिसरात दहशत माजवली.
घटनेची माहिती मिळताच वारजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास वारजे पोलीस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | vandalized cars in hotel; Incidents in Warje area

 

हे देखील वाचा :

Palghar Crime | पालघरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या; पत्रकारितेचा कोर्सही केला होता

Pune Rickshaw Strike | आज पुन्हा रिक्षाचे आरटीओ कार्यालयासमोर चक्का जाम आंदोलनाची हाक

PMPML | पीएमपीच्या बेशिस्त चालकावर कडक कारवाई, बडतर्फीचा आदेश

 

Related Posts