IMPIMP

PMPML | पीएमपीच्या बेशिस्त चालकावर कडक कारवाई, बडतर्फीचा आदेश

by nagesh
PMPML | a woman standing at a signal was hit by a bus unruly driver of pmp sacked in just an hour

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   पीएमपीच्या (PMPML) ई-बस चालकाने रविवारी (दि. 11) सकाळी दहाच्या सुमारास भैरोबा नाला चौकात सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीवरील एका महिलेला धडक (PMPML) दिली होती. यात ही महिला किरकोळ जखमी झाली असून, दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतर अवघ्या तासाभरात पीएमपी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी चालकाला बडतर्फीचा आदेश दिला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भेकराईनगर-वारजे माळवाडी-एनडीए गेट (एमएच 12 टी व्ही 0693) ही गाडी हडपसरवरून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात निघाली होती. बसचा वेग यावेळी क्षमतेपेक्षा जास्त होता. भैरोबा नाला चौकात बस आली असता सिग्नलवर उभ्या असलेल्या एका महिलेला बसने मागून धडक दिली. या अपघातात महिला किरकोळ जखमी झाली असून, दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी चौकात उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांनी चालकाला तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. या प्रकरणाची माहिती पीएमपी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना देण्यात आली. (PMPML)

 

बकोरिया यांनी बेशिस्त चालक रोहित तानाजी गवळी (बॅच क्र. 255) याला तात्काळ बडतर्फ करण्याचे आदेश दिले.
गवळी हा ठेकेदाराचा चालक होता. यापूर्वीदेखील ठेकेदारांच्या चालकांनी बेशिस्त गाडी हाकल्याच्या अनेक
तक्रारी पीएमपी प्रशासनाला मिळाल्या होत्या. या कारवाईमुळे आता तरी पीएमपी चालकांवर वचक बसेल,
अशी शक्यता आहे. प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

 

 

Web Title :- PMPML | a woman standing at a signal was hit by a bus unruly driver of pmp sacked in just an hour

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून कोयत्याने सपासप वार, 19 वर्षीय तरुण गजाआड; ताडीवाला रोडवरील घटना

Pimpri Chinchwad Fire News | पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीत शॉर्ट सर्किट; चार्जिंगला लावलेल्या 15 इलेक्ट्रिक गाड्या जळून खाक

Ajit Pawar | शाई फेकली म्हणून खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा; राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांवर अद्याप गुन्हा का नाही? – अजित पवार

 

Related Posts