IMPIMP

Pune Crime | परदेशात नोकरीच्या आमिषाने महिलेने 10 जणांना फसवलं, समर्थ पोलिस ठाण्यात FIR

by nagesh
Pune Crime | Bank manager embezzled 2.5 crores of confiscated property; FIR in Lonikand Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पोलंड येथे वर्क परमिट प्राप्त करुन देऊन नोकरी लावण्याचा आमिष दाखवून (Lure Of Job) एका महिलेने ९ ते १० जणांची १० लाख ५५ हजारांना गंडा (Cheating Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी नाना पेठेतील (Nana Peth, Pune) एका ३१ वर्षाच्या तरुणाने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३८/२२) दिली आहे. हा प्रकार २८ मे २०२१ ते २८ मार्च २०२२ दरम्यान घडला आहे. (Fraud Case)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नेटवर परदेशात नोकरीच्या संधी शोधत होते.
त्यावेळी मयुरी श्रीवास्तव या तरुणीने त्यांच्याशी संपर्क साधला व पोलंड या देशात वर्क परमिट प्राप्त करुन
नोकरी लावण्याचे आश्वासन दिले (Pune Crime).
वर्क परमिटच्या बिझनेसमध्ये सामील लोण्याचे आश्वासन देऊन फिर्यादी व
इतर ९ ते १० जणांकडून वेळोवेळी १० लाख ५५ हजार ७९१ रुपये घेतले.
त्यांना कोणालाही नोकरी न लावता तसेच व्हिसा न देता खोटे अ‍ॅग्रीमेंट तयार करुन त्यांना पाठविले व
त्यांची दिशाभूल करुन फसवणूक करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साठे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Woman cheated 10 people with the lure of job abroad, FIR in Samarth police station

 

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Expansion | मंत्रीमंडळ विस्तारात पुण्याला एक मंत्रीपद, चंद्रकांत पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, इतरांना संधी नाही?

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारकडून ‘दे धक्का’; आज शपथ घेणारे 18 कॅबिनेट मंत्री, संजय शिरसाट यांचा पत्ता कट ?

CM Eknath Shinde | शिवसेनेच्या 2 आमदारांना लागली लॉटरी, बंडखोरीनंतर मंत्रिपद

 

Related Posts