IMPIMP

Pune Crime | इंदापूरातील धक्कादायक घटना ! सावकाराच्या त्रासाला कंटाळून 30 वर्षीय तरूणाने घेतला गळफास

by nagesh
Nanded Crime | nanaded student suicide of 10 year old student of tribal ashram school in nanded crime news

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | इंदापूर तालुक्यातील (Indapur) एका 30 वर्षीय तरूणाने खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना गुरूवारी (20 जानेवारी) रोजी पहाटे 5 च्या दरम्यान उघडकीस आली आहे. विशाल दत्तात्रय गवळी (Vishal Dattatraya Gawali) (वय 30, रा.नेताजीनगर, चाळीस फुटी रोड, इंदापूर) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत युवकाचे चुलते उत्तम अंकुश गवळी (Uttam Ankush Gawali) (वय 49) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात (Indapur Police Station) फिर्याद दिली. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत माहिती अशी, विशाल गवळी (Vishal Gawali) यांने आत्महत्या करण्यापुर्वी खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहुन ठेवली होती. ती चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. विशाल याने राहत्या खोलीतील भिंतीला लावलेल्या एका काँक्रिट खिळ्याला सुताच्या दोरीने गळफास घेतला. सदरची घटना उघडकीस आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या गळ्यातील फास सोडवून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये हलवले. दरम्यान उपचारादरम्यान त्याचा मृत्यू (Died) झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. (Pune Crime)

 

दरम्यान, ”एका खासगी सावकाराकडून 50 हजार रूपये व्याजाने घेतले होते.
सदरचे पैसे सावकाराला परत दिले होते. तरीही सावकाराने आमच्यावर केस केली.
सदर पैसे देताना सावकाराने चेक व नोटरी करून घेतली आहे.
त्याने खूप त्रास दिल्याने आत्महत्या करीत आहे. असं विशालने आत्महत्येपुर्वी चिठ्ठीत नमुद केलं आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | young man committed suicide by hanging himself after getting fed up with money laundering in indapur of pune district

 

हे देखील वाचा :

Multibagger Stock | अवघ्या एक वर्षात ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने दिला 2800% रिटर्न, 1 लाख झाले 29 लाख, तुम्ही खरेदी केले का?

Exercise Mistakes | एक्सरसाईज करताना नेहमी लोक करतात ‘या’ 4 चूका, जाणून घ्या कोणत्या

Post Office Rules | पोस्ट ऑफिसने अकाऊंटबाबत बदलले हे नियम, तात्काळ जाणून घ्या सविस्तर

Eknath Khadse | बालेकिल्ल्यातील पराभव एकनाथ खडसेंच्या जिव्हारी; म्हणाले – ‘भाजप-शिवसेनेची छुपी युती’

Anil Deshmukh | अनिल देशमुखांचा आयोगासमोर मोठा दावा, म्हणाले – ‘…त्यावेळी परमबीर सिंह थरथर कापत होते’

 

Related Posts