IMPIMP

Pune Crime | खाणीत तोल जाऊन पडल्याने तरुणीचा मृत्यु; कात्रज येथील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | Young woman dies after tripping in mine; The incident at Katraj, a case has been registered against both

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | कात्रजमधील भिलारेवाडी (Bhilarewadi, Katraj) परिसरात खाणीत तोल जाऊन पडल्याने तरुणीचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ऋतिका जयवंत काळे Ritika Jaywant Kale (वय २१, रा. भिलारेवाडी, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत ऋतिकाच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनिल तुळशीराम महाजन (Sunil Tulshiram Mahajan) व तुळशीराम महाजन (Tulshiram Mahajan) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिलारेवाडी परिसरात खाण आहे. खाणीच्या परिसरात या भागातील रहिवाशांकडून कचरा टाकण्यात येतो. ऋतिका कचरा टाकण्यासाठी खाणीच्या परिसरात गेली होती. त्या वेळी तोल जाऊन ती खाणीत पडल्याने गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. (Pune Crime)

 

खाणीच्या परिसरात कठडे नसल्याने दुर्घटना घडल्याचे ऋतिकाच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे.
सुरक्षेसाठी खाणीच्या कडेला कोणतेही कंपाऊंड करणे आवश्यक असताना कोणत्याही उपाय योजना न
केल्याने तरुणीचा मृत्यु झाल्याने दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून
पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव (Sub-Inspector of Police Nitin Jadhav) तपास करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Young woman dies after tripping in mine; The incident at Katraj, a case has been registered against both

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कोर्ट मॅरेज करुन विधीवत लग्नासाठी हुंड्याची मागणी करुन नांदविण्यास दिला नकार; हडपसर पोलीस ठाण्यात FIR

NCP MLA Jitendra Awhad | विनयभंगाच्या आरोपानंतर जितेंद्र आव्हाडांच्या मुलीची प्रतिक्रिया, म्हणाली- ‘महिलांच्या सुरक्षेसाठी कायदे बनले, मात्र…’

Delhi Crime | वसईतील तरुणीची दिल्लीत निर्घूण हत्या; शरीराचे केले 35 तुकडे

 

Related Posts