IMPIMP

NCP MLA Jitendra Awhad | विनयभंगाच्या आरोपानंतर जितेंद्र आव्हाडांच्या मुलीची प्रतिक्रिया, म्हणाली- ‘महिलांच्या सुरक्षेसाठी कायदे बनले, मात्र…’

by nagesh
NCP MLA Jitendra Awhad | natasha awhad daughter reaction on fir against jitendra awhad by bjp worker

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची (Molestation) तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीवरुन जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. दरम्यान आता जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड (Natasha Awhad) हिने प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या वडिलांवर जे आरोप करण्यात आले आहेत, ते खोटे आणि धक्कादायक असल्याचे नताशाने म्हटले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

माझ्या वडिलांवर जो आरोप करण्यात आला आहे, तो अतिशय धक्कादायक आहे. या आरोपांमुळे माझ्या परिवाराला मानसिक त्रास (Mental Distress) होतो आहे. काल रात्रीपासून माझे वडील आणि आम्ही झोपलेलो नाही, असे नताशा आव्हाडने सांगितले.

 

राजकारणात असे वाद विवाद होत राहतात. मात्र, या पद्धतीने जेव्हा तुम्ही आरोप करता, तेव्हा त्याचा परिणाम एका व्यक्तीवर नाही, तर संपूर्ण परिवारावर होत असतो. महिलांच्या सुरक्षेसाठी हे कायदे बनवले आहेत. मात्र, याचा गैरवापर होत असेल तर त्याचा परिणाम इतर महिलांवरही होतो, असे नताशा आव्हडने म्हटले.

 

दरम्यान, ऋता आव्हाड (Ruta Awhad) यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याला (Mumbra Police Station) एक
पत्र लिहिलं आहे. तक्रारदार महिला पोलीस संरक्षण (Police Protection) मिळावं म्हणून खोटे राजकीय आरोप
करु शकते. आव्हाड यांच्या नावाने तक्रारदार महिलेला धमकीचा फोन जाऊन खोटी तक्रार होऊ शकते,
असं ऋता आव्हाड यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. अशी काही तक्रार आली तर चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

काय आहे प्रकरण?

कळव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये पुलाच्या
लोकार्पणाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. या कार्यक्रमामध्ये जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad)
यांनी एका महिलेला हात लावून बाजूला केलं. यानंतर महिलेने जितेंद्र आव्हाड यांच्यावर गैरवर्तन केल्याचा
आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

 

 

Web Title :- NCP MLA Jitendra Awhad | natasha awhad daughter reaction on fir against jitendra awhad by bjp worker

 

हे देखील वाचा :

Pune Crime | हप्ता देण्यासाठी हॉटेलची तोडफोड करुन मॅनेजरच्या खूनाचा प्रयत्न, सोमवार पेठेतील घटना

Delhi Crime | वसईतील तरुणीची दिल्लीत निर्घूण हत्या; शरीराचे केले 35 तुकडे

Chandrashekhar Bawankule | ‘जितेंद्र आव्हाडांचे समर्थन करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल व्हायला हवेत’ – चंद्रशेखर बावनकुळे

 

Related Posts