IMPIMP

Pune Cyber Crime | ‘जीवनसाथी’ शोधण्याच्या नाद खुळा ! लग्नासाठी स्थळ दाखविण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची 16 लाखाची फसवणूक

by nagesh
Pune Cyber Crime News | 16 lakh fraud on the pretext of completing an online task on a Telegram group

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | एका ज्येष्ठ नागरिकाने (Senior Citizen) लग्नासाठी जीवनसाथी डॉट कॉम (Jeevansathi) या
वेबसाईटवर नावनोंदणी केली होती.
त्याचा गैरफायदा घेऊन सायबर चोरट्यांनी (Pune Cyber Crime) दुसर्‍या वेबसाईटवर नावनोंदणी करायला लावून स्थळ दाखविण्याच्या नावाखाली तब्बल १६ लाख ३२ हजार रुपयांना गंडा (Fraud Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे (Online Fraud With Senior Citizen).
या प्रकरणी वाघोली (Wagholi) येथील एका ६३ वर्षाच्या नागरिकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे MSEB मधून निवृत्त झाले आहेत.
त्यांचे पत्नी व मुलांशी पटत नसल्याने ते वेगळे राहतात. उतार वयात कोणीतरी सोबत असावे,
यासाठी त्यांनी जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर लग्नासाठी नावनोंदणी केली होती.
त्यानंतर त्यांना लव्ह इन या वेबसाईटवरुन संपर्क साधण्यात आला व नावनोंदणीसाठी ९२० रुपये भरण्यास सांगितले.
त्यानुसार त्यांनी पैसे भरले.
त्यानंतर आरोपींनी वेगवेगळ्या मोबाईलवरुन फोन करुन त्यांना स्थळ दाखविण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी १६ लाख ३२ हजार ५७९ रुपये ऑनलाईन घेतले.
मात्र कोणतेही स्थळ दाखविले नाही अथवा पैसे परत न करता फसवणूक (Cheating Case) केली. (Pune Cyber Crime)

 

उतार वयात सोबत असावी, म्हणून त्यांनी केलेला हा प्रयत्न चांगलाच अंगलट आला असून सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
लोणीकंद पोलीस तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Cyber Crime | cyber crime online fraud case of Rs 16 lakh wagholi senior citizen in the name of showing a place for marriage lonikand police station pune

 

हे देखील वाचा :

Rupali Chakankar On BJP MLA Ganesh Naik | ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ प्रकरणी गणेश नाईक यांना अटक होणार, चौकशी करणार – रूपाली चाकणकर

Pune Crime | खोदकामात सोन्या-चांदीची नाणी सापडल्याचे सांगून ज्येष्ठ व्यावसायिकाची 11 लाखांची फसवणूक; बुधवार पेठेतील घटना

Gold Silver Price Today | सोन्या – चांदीचे भाव स्थिर; जाणून घ्या आजचे दर

 

Related Posts