IMPIMP

Pune Fire News | पुण्यातील एका कंपनीला भीषण आग, ‘स्फोटा’मुळं भीतीचं वातावरण; अग्नीशमनचे 8 बंब घटनास्थळी दाखल (व्हिडीओ)

by nagesh
Pune Fire News | Terrible fire at a company in Pune, atmosphere of fear due to 'explosion'; Firefighters arrive at 8 bomb scene (video)

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Fire News | शहरातील नांदेड फाटा येथील भाऊ इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये (bhau industrial estate sinhagad road nanded phata) एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरूवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही आग (Pune Fire News) लागली आहे. कंपनीत सलग स्फोट होत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, पुणे व पीएमआरडीए अग्नीशमन दलाचे 8 बंब घटनास्थळी दाखल झाले असुन आग विझवण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी पोहचले आहेत. सिलेंडर स्फोटासारखे आवाज होत असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनीच्या बाहेर बघ्यांनी देखील मोठया प्रमाणावर गर्दी केली आहे. अग्नीशमन दलाकडून बचावकार्य युध्दपातळीवर सुरू आहे. कंपनीत काही प्रमाणात केमिकल असल्याची देखील माहिती समोर येत आहे. सर्वच यंत्रणांकडून बचावकार्य सुरू आहे.

 

Web Title : Pune Fire News | Terrible fire at a company in Pune, atmosphere of fear due to ‘explosion’; Firefighters arrive at 8 bomb scene (video)

 

हे देखील वाचा :

Rahul Gandhi | राहुल गांधींचा RSS वर निशाणा; म्हणाले – ‘महात्मा गांधींच्या आजूबाजूला महिला दिसायच्या, मोहन भागवत यांच्यासोबत का नाही?’

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 4,364 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Court | शिवाजीराव भोसले सह. बँकेचं 496 कोटीचं अपहार प्रकरण ! आमदार अनिल भोसले, शैलेश भोसले, मंगलदास बांदल यांच्यासह ‘या’ 7 जणांविरूध्द कोर्टात 7380 पानी पुरवणी दोषारोप पत्र

 

Related Posts