IMPIMP

Pune Gang Rape Case | धक्कादायक ! पुण्याच्या दत्तवाडीत 25 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार, प्रचंड खळबळ

by nagesh
Crime News | 3 soldiers of army gangrape married woman also made porn video News Delhi News

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Gang Rape Case | 25 वर्षीय तरूणीला फुस लावून घरी आणून तिच्यावर सामुहिक बलात्कार करणार्‍या चौघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना जनता वसाहतीत (janta vasahat) सायंकाळी घडली. सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे (Pune Gang Rape Case) प्रचंड खळबळ उडाली आहे.

श्रीकांत सरोदे (वय 36), आदित्य ऊर्फ सन्या पवार (वय 19), सुर्वेश जाधव (वय 36) आणि आशिष मोहिते (वय 18, सर्व रा. जनता वसाहत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्याचे (Dattawadi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर (senior police inspector krushna indalkar) यांनी माहिती दिली. भारती विद्यापीठ (bharti vidyapeeth katraj) परिसरात राहणारी एक 25 वर्षाची तरुणी स्वारगेटवरुन (swargate) शुक्रवारी सायंकाळी घरी जात होती. यावेळी आरोपींपैकी एकाने तिला जनता वसाहतीत आणले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

त्यानंतर त्याने इतरांना बोलावून घेतले. चौघांनी मिळून तिच्यावर एका मागोमाग एक बलात्कार केला. हा सर्व प्रकार सुरु असताना या तरुणीच्या रडण्याचा आवाज आल्याने गल्लीत राहणार्‍यांना संशय आला. त्यांनी घराला बाहेरुन कडी लावली व पोलिसांना कळविले. दत्तवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले व या तरुणीची सुटका करुन चौघांना अटक केली.

या घटनेमुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.
दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police) आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरूध्द सामुहिक बलात्काराचा (Gang Rape) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास दत्तवाडी पोलिस ठाण्यातील अधिकारी करीत आहेत.

 

Web Title :  Pune Gang Rape Case | Shocking! Dattawadi 25 year old girl gang raped in Pune

 

हे देखील वाचा :

Superfood For Men | पुरुषांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवतात ‘हे’ 10 सुपरफूड, डाएटमध्ये करा समावेश; जाणून घ्या

COVID-19 in India | कोरोनाचा ग्राफ भीतीदायक ! देशात गेल्या 24 तासात आल्या 46759 नवीन केस, 509 जणांचा मृत्यू

Corona Vaccination | कोरोनाविरूद्ध विक्रमी लसीकरण, शुक्रवारी 1 कोटी लोकांना दिली व्हॅक्सीन

 

Related Posts