IMPIMP

Pune Garbage Depots Uruli Devachi – Fursungi | उरूळी देवाची-फुरसुंगी कचरा डेपोचा मागील 20 वर्षांत कायापालट ! अभ्यासकांसाठी पर्यटनस्थळ म्हणून विकास करणार; अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार

by nagesh
 Pune Garbage Depots Uruli Devachi - Fursungi | Transformation of Uruli Devachi-Fursungi Garbage Depot in last 20 years! To be developed as a tourist destination for scholars; Additional Municipal Commissioner Dr. Kunal Khemnar

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Garbage Depots Uruli Devachi – Fursungi | उरूळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोने मागील ४० वर्षात अनेक स्थित्यंतरे पाहीली आहेत. अगदी कचर्‍याचा वास, भूजल तसेच वायू प्रदूषण आणि आगीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने Pune Municipal Corporation (PMC) कायद्याच्या धाकासोबतच अधिकार्‍यांच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे या डेपोचा कायापालट झाला आहे. येत्या काळात कचरा व्यवस्थापनाचे धडे देणारे पर्यटनस्थळ म्हणून या परिसराचा येत्या काळात विकास करण्यात येईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार (Dr Kunal Khemnar) यांनी सांगितले. (Pune Garbage Depots Uruli Devachi – Fursungi)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

डॉ. कुणाल खेमनार यांच्या नेतृत्वाखाली आज घन कचरा व्यवस्थापन प्रमुख आशा राउत (Asha Raut PMC), कार्यकारी अभियंता सुधीर चव्हाण (Sudhir Chavan PMC), उपअभियंता राजेंद्र तिडके (Rajendra Tidke), अभियंता संकेत जाधव (Sanket Jadhav PMC) यांच्या पथकाने उरूळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोला भेट देउन येथे सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यानंतर डॉ. खेमनार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. खेमनार म्हणाले, की १९८९ मध्ये कोथरूड येथील कचरा डेपो येथे हलविण्यात आला. आजमितीला तब्बल १६३ एकर जागेमध्ये हा प्रकल्प आहे. कचरा डेपोमुळे याठिकाणी आरोग्याच्या दृष्टीने अनेक समस्या निर्माण झाल्या, ही वस्तुस्थिती आहे. २००० मध्ये कचरा डेपो विरोधात न्यायालयात पहिला दावा दाखल झाला. त्यानंतर आतापर्यंत उच्च न्यायालय आणि एनजीटीमध्ये ५ दावे दाखल झाले आहेत. परंतू न्यायालय, एनजीटी आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने वेळोवेळी दिलेले आदेश आणि महापालिकेने येथील समस्या दूर करण्यासाठी न्यायालयात केलेली प्रतिज्ञापत्र यानुसार मागील २० वर्षात महापालिका प्रशासनाने काम केले आहे. (Pune Garbage Depots Uruli Devachi – Fursungi)

न्यायालयाने संपुर्ण देशातच कचर्‍यावर प्रक्रिया करण्याचे आदेश देतानाच ओपन डंपिंगवर बंदी घातली. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने संपुर्ण शहरात गोळा होणार्‍या सुमारे २२०० टन कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारले आहेत. देवाची उरूळी- फुरसुंगी डेपोमध्ये कचरा डंपिंग यापुर्वीच बंद करण्यात आले आहे. उलट त्याठिकाणी पुर्वी साठलेल्या कचर्‍याचे बायोमायनिंग करून २१ एकरहून अधिक जागा रिकामी करण्यात आली आहे. भूमी ग्रीन या कंपनीने विहीत मुदतीत बायोमायनिंगचे काम पूर्ण करण्यासाठी यंत्रणा उभारली असून शास्त्रीय पद्धतीने मागील तीन वर्षांपासून काम सुरू आहे. येत्या डिसेंबरपर्यंत सुमारे २० लाख मेट्रीक टन कचर्‍यावरील बायोमायनिंग प्रक्रिया पूर्ण होईल. याठिकाणी २००४ पासून कचर्‍याचे कॅपिंग करण्यात आले असून कचर्‍यापासून निर्माण होणारा मिथेन गॅस हवेतच पेटवून नष्ट करण्याची यंत्रणा उभारली आहे. कचर्‍यापासून निर्माण होणार्‍या लिचेटही टाक्यांमध्ये साठवून त्यावर पक्रिया करण्यात येत आहे. आगीच्या घटना देखिल कमी झाल्याअसून अग्निशामक गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याने आगीच्या घटना जवळपास बंद झाल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या ठिकाणी भूमी ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून सुमारे २०० मे.टन मिश्र कचर्‍यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. पूर्ण क्षमतेने चालणार्‍या या प्रकल्पातून कचर्‍यापासून सेंद्रीय खत निर्मिती होत आहे. शेतीसाठी अत्यंत स्वस्त दरात उत्तम प्रकारचे हे खत असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाल्याने शासनाच्या विविध विभागांच्या परवानगीने खुल्या बाजारात शेतकर्‍यांना नाममात्रात खत विक्री होत आहे. या प्रकल्पाच्या छतावरच सौर उर्जा प्रकल्प राबविण्यात आला असून येथे १०० किलो वॅट वीजनिर्मिती होते. कचरा डेपोच्या आवारातील प्रकाश व्यवस्था व कार्यालयांमधील वीजेची गरज यातून भागविली जात आहे.

 

कचरा डेपोच्या आवारातील बफर झोनमध्ये अमृत वन योजनेअंतर्गत देशी प्रजातीची तब्बल १६ हजार झाडे लावण्यात आली आहेत.
त्यांचे संगोपनही चांगल्या पद्धतीने करण्यात येत असून ही झाडे १५ ते २० फूटांची झाली आहेत.
त्यामुळे पक्षांचा अधिवासासोबतच पर्यावरणीयदृष्टया आल्हाददायक चित्र निर्माण झाले आहे.
प्रक्रिया न होउ शकणार्‍या कचर्‍यातील घटकांचे सायंटिफीक लॅन्डफील करण्याचा देशातील बहुधा एकमेव प्रकल्प याठिकाणी राबविण्यात येत आहे.
कचरा व्यवस्थापनामध्ये न्यायालयाने वेळोवेळी दिलेले आदेश आणि नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून महापालिका करत असलेल्या
उपाययोजनांमुळे कचर्‍याच्या अभ्यासकांसाठी निश्‍चितच हा कचरा डेपो पर्यटनस्थळ झाला आहे.
कचरा व्यवस्थापनाबाबत शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी पर्यटनस्थळाच्या दृष्टीने येत्या काही काळात या परिसराचा विकास करण्यात येईल,
अशी माहीती डॉ. खेमनार यांनी दिली. यावेळी राजेंद्र तिडके आणि संकेत जाधव यांनी सादरीकरणाद्वारे मागील २५ वर्षात करण्यात आलेल्या उपाययोजनांची विस्तृत माहिती दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Garbage Depots Uruli Devachi – Fursungi | Transformation of Uruli Devachi-Fursungi Garbage Depot in last 20 years! To be developed as a tourist destination for scholars; Additional Municipal Commissioner Dr. Kunal Khemnar

 

हे देखील वाचा :

NCP MLA Sunil Tingre | वडगाव शेरीतील प्रश्नांबाबत महापालिका अ‍ॅकशन मोडवर ! आमदार टिंगरे यांच्या उपोषनाला यश; भिंत तोंडून आमदारांनी रस्ताच केला मोकळा

Ajit Pawar | ‘नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करु नयेत, त्याची सुरुवात चंद्रकांत पाटलांनी स्वत: पासून करावी’, अजित पवारांचा टोला (व्हिडिओ)

CM Eknath Shinde | ‘मी सर्वांना कामाला लावलंय, घरात बसणारे रस्त्यावर येऊ लागले’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला (व्हिडिओ)

 

Related Posts