IMPIMP

Pune Journalist Arrest | व्यावसायिकाकडे 5 लाखांची खंडणी मागणार्‍या पत्रकार अर्जुन शिरसाठ याला अटक; यापूर्वीही उकळली होती पाच लाखांची खंडणी, फोनवरील संभाषणातून उघड

by nagesh
Pune Crime | three criminals arrested for armed attack on hotel workers in warje malwadi pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Journalist Arrest | हडपसर येथील व्यावसायिकाकडे 5 लाख रुपयांची खंडणी (ransom) मागून ती न दिल्यास तुम्हाला जड जाईल, अशी धमकी देणार्‍या पत्रकाराला (Pune Journalist Arrest) हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) अटक केली आहे. 5 लाखाच्या खंडणी प्रकरणी पत्रकाराला अटक झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अर्जुन लक्ष्मण शिरसाठ (वय 41, रा. आंबिल ओढा वसाहत, दांडेकर पुल) (Journalist Arjun Laxman Shirsath) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अर्जुन शिरसाठ हा पूर्वी पुण्यातील एका मोठ्या वृत्तपत्रात काम करीत होता. सध्या तो कोणत्याही वृत्तपत्रात काम करीत नाही.

 

याप्रकरणी हडपसर परिसरातील हिंगणेआळी येथे राहणार्‍या एका 32 वर्षाच्या व्यावसायिकाने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. अर्जुन शिरसाठ याने या व्यावसायिकाला फोन करुन खंडणी मागितली.  त्या फोन कॉलवरुन त्याने या व्यावसायिकाकडून यापूर्वीही 5 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार हडपसर येथील माळवाडी रोडवरील कुमार पिका सोसायटी येथे गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला.

 

 

फिर्यादीचे गांधी चौकात दुकान आहे. त्यांच्या दुकानातील सिगारेट, बडीशेप, बिडी, गोळ्या असा माल चालक टेम्पोतून घेऊन जात होता. पत्रकार म्हणविणार्‍या शिरसाट याने टेम्पो अडविला. टेम्पोची चावी काढून घेतली. हे त्यांच्या टेम्पो चालकाने फिर्यादींना सांगितले. शिरसाट याने फिर्यादी यांना फोन करुन ‘‘तुम्ही तुमच्या टेम्पोमध्ये सिगारेट, बिडी विकत असता, तुम्ही मला 5 लाख रुपये द्या. तुम्ही 5 लाख रुपये दिले नाही तर तुम्हाला जड जाईल, तुमच्यावर केस करावी लागेल. तुम्हाला 5 लाख रुपये द्यावेच लागेल, ’’अशी मागणी केली व फोन ठेवून दिला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

त्यानंतर टेम्पोचालकाने चावी मागितल्यावर शिरसाट याने त्याला खलास करण्याची धमकी देऊन डोक्यात काचेची बाटली मारुन जखमी केले.
टेम्पोची पुढील काच फोडली.
हे समजल्यावर त्यांनी चालकाला हडपसर पोलीस ठाण्यात बोलावले. तेथून त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.
हडपसर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

पत्रकार शिरसाठ याचे फिर्यादी यांच्याबरोबर फोनवरील संभाषणाचे रेकॉर्डिंग पोलिसांनी हस्तगत केले आहे.
त्यात फिर्यादी यांच्यावर गुटखा विक्री केल्याप्रकरणी केस झाली होती. तेव्हा तुम्ही 5 लाख रुपये दिले होते.
आताही द्या अशी मागणी शिरसाट याने केल्याचे दिसून येते.
त्यावर फिर्यादी याने आता हे काम आम्ही सोडून दिले आहे.
त्यामुळे तुम्हाला आता कशाचे पैसे द्यायचे, असे विचारताना दिसत आहेत.
हडपसर पोलिसांनी अर्जुन शिरसाट याला अटक (Pune Journalist Arrest) केली असून सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर (api padsalkar) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Journalist Arrest | Journalist Arjun Shirsath arrested for demanding Rs 5 lakh ransom from businessman; A ransom of Rs 5 lakh was also taken earlier, revealed from a phone conversation

 

हे देखील वाचा :

Surekha Punekar | लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Pune NCP | नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नव्या जबाबदारीचे नियुक्तीपत्र प्रदान; शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले – ‘पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकणारच’

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 183 नवीन रुग्ण, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts