IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 183 नवीन रुग्ण, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ; जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona | Discharge of 47 corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्ण संख्येत वाढ होत आहे. तर कोरोनामुक्त (Recover patient) होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 183 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद यापूर्वी मृत्यू झालेल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 183 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 72 हजार 191 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 120 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 67 हजार 385 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या एक हजाराच्या आत आली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या हजाराच्या वर गेली आहे. सध्या शहरामध्ये 1 हजार 121 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात शहरातील 01 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4416 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

दिवसभरात 18,016 जणांना लस

गुरुवारी (दि.16) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी कोविड लसीकरण केद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 18 हजार 016 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 16 लाख 98 हजार 262 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | 183 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, increase in number of active patients; Learn other statistics

 

हे देखील वाचा :

Surekha Punekar | राष्ट्रवादी पक्षात प्रवेश का? लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर म्हणाल्या…

Virat Kohli Leave Captaincy | कोहलीची ‘विराट’ घोषणा ! वर्ल्ड कपनंतर T-20 फॉर्मेटचे कर्णधारपद सोडणार

Love Relationship | तुमच्या प्रेमाला प्रभावित करायचंय? तर ‘या’ सवयींपासून लांब रहा; जाणून घ्या

 

Related Posts