IMPIMP

Pune NCP | नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नव्या जबाबदारीचे नियुक्तीपत्र प्रदान; शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले – ‘पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकणारच’

by nagesh
NCP Prashant Jagtap | 'Chandrakant Patil may have high expectations from Ajit Pawar instead of Municipal Corporation

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune NCP | ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यकारिणीतील सर्व शिलेदार, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण जोमाने काम करू. प्रभाग तिथे शाखा, वॉर्ड तिथे शाखा उभारून पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोचवू आणि येत्या निवडणुकीत पुणे महानगरपालिकेत (PMC) राष्ट्रवादी काँग्रेसचा (Pune NCP) झेंडा फडकवू,’ असा निर्धार शहराध्यक्ष प्रशांत जगताप (ncp city president prashant jagtap) यांनी व्यक्त केला. पक्षाच्या नवनियुक्त शहर कार्यकारिणीची पहिली बैठक गुरुवारी पार पडली. बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांना नव्या जबाबदारीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी जगताप बोलत होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार (Sharad Pawar), राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त शहर कार्यकारिणीची पहिली बैठक गुरुवारी कृष्णसुंदर लॉन्स (krushna sundar lawns) येथे पार पडली. कमलताई ढोले, कुमार गोसावी, दीपालीताई धुमाळ, राजलक्ष्मीताई भोसले, शांतिलाल सूरतवाला, रवींद्र माळवदकर, सदानंद शेट्टी, बाळासाहेब बोडके, शंकरराव केमसे, दीपक मानकर, विशाल तांबे, सचिन दोडके, निलेश निकम, अंनिस सुंडके, भगवान साळुंके आदी मान्यवरांसह शहरातील सर्व विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचलन प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते नव्या कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र सुपूर्त करण्यात आले. तसेच, पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपकडून (BJP) ॲमेनिटी स्पेसच्या (pune amenity space) विक्रीचा जो घाट घातला जात आहे, त्यास पक्षाचा विरोध असल्याचा ठराव पक्षाचे नवनियुक्त प्रवक्ते विशाल तांबे यांनी मांडला. त्यास नगरसेवक सचिन दोडके यांनी अनुमोदन दिले. सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा ठराव मंजूर करण्यात आला.

या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कार्यकारिणीला संबोधित केले. ‘पुणे हे शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांचे शहर आहे. आज पुणे शहर हे देशातील सर्वांत मोठे दुसऱ्या क्रमांकाचे शहर बनले आहे आणि आपण सर्वजण या मोठ्या शहरात आपल्या पक्षासाठी कार्यरत राहणार आहोत. आपण कार्यकारिणीतील सर्व २८३ जण जनता आणि पक्ष यातील दुवा आहोत. त्यामुळे, आपल्यावर पक्षाची खूप मोठी जबाबदारी आहे. काय घडले आहे याचा मागोवा घेणे आणि काय घडणार आहे, याची माहिती घेण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे. जनतेचे प्रश्न, धोरणे, चर्चा, संदेश वरिष्ठांपर्यंत पोचविण्याचे कार्यकारिणीचे काम आहे. आपण पक्षासाठी कान आणि डोळे बनून कार्यरत राहणार आहोत. आपण पक्षासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहिलो, तर महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीत महानगरपालिकेत (Pune Corporation Elections) राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही,’ असा विश्वास प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.

‘आपण राजकारणात, समाजकारणात वावरत असताना विविध शिबिरांचे, कार्यक्रमांचे आयोजन,
जनतेसाठी आंदोलन हे करावेच लागणार आहेत. परंतु, ही कार्यकारिणी केवळ तेवढ्यापुरतीच मर्यादित राहणार नाही.
आपल्याला त्यापलीकडे जाऊन काम करायचे आहे.
त्यासाठी आपल्याला वेळोवेळी वरिष्ठांचे मार्गदर्शन असणारच आहे.
कार्यकारिणीत मांडले जाणारे मुद्दे आणि मते तितक्याच गांभीर्याने घेतली जातील.
सर्व सूचनांचे नक्कीच स्वागत केले जाईल. त्यामुळे, जनतेच्या हिताच्या कोणत्याही सूचना करा,
सोशल मीडियावर सक्रीय राहा,’ असे आवाहन प्रशांत जगताप यांनी केले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

Web Title :- Pune NCP | Provide appointment letters of responsibility to newly appointed office bearers; City President Prashant Jagtap said – ‘NCP’s flag will fly in Pune Municipal Corporation

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 183 नवीन रुग्ण, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ; जाणून घ्या इतर आकडेवारी

Surekha Punekar | राष्ट्रवादी पक्षात प्रवेश का? लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर म्हणाल्या…

Virat Kohli Leave Captaincy | कोहलीची ‘विराट’ घोषणा ! वर्ल्ड कपनंतर T-20 फॉर्मेटचे कर्णधारपद सोडणार

 

Related Posts