IMPIMP

Pune Lonikand Crime | मुलीसोबत अश्लील चाळे, सावत्र बापाला लोणीकंद पोलिसांकडून अटक

by sachinsitapure

पुणे :  –Pune Lonikand Crime | सावत्र बापाने 19 वर्षीय मुलीशी अश्‍लील चाळे करून विनयभंग केला (Molestation Case). बापलेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी ही घटना हवेली तालुक्यातील बकोरी गावात घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police Station) सावत्र बापाला अटक केली आहे. हा प्रकार जुलै 2023 ते 17 मार्च 2024 या कालावधीत पिडितेच्या घरात घडला आहे.(Pune Lonikand Crime)

याबाबत 19 वर्षीय पीडित मुलीने मंगळवारी (दि.19) लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन येरवडा परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय सावत्र बापावर आयपीसी 354, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने आरोपीसोबत दुसरे लग्न केले आहे. लग्नानंतर आरोपीची वाईट नजर पीडित मुलीवर पडली.सापत्र बापाने मुलीला अश्लील बोलून शारीरिक सुखाची

मागणी केली (Physical Relationship). तसेच तिच्यासोबत अश्लील चाळे करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याबाबत आईला सांगितले तर तुला व तुझ्या आईला मारुन टाकण्याची धमकी आरोपीने दिली. दरम्यान फिर्यादी तरुणीचे लग्न जमले. यावरुन आरोपीने फिर्यादी च्या आईला लग्न कोणी ठरवले असे बोलून शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.

अश्लील शेरेबाजी करुन विनयभंग

धनकवडी : महिलेकडे पाहून अश्लील शेरेबाजी करुन मानसिक त्रास देऊन विनयभंग केल्याची घटना धनकवडी येथे
घडली आहे. याप्रकरणी 46 वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्य़ाद
दिली आहे. याप्रकरणी योगेश रामचंद्र तरडे (वय-35 रा. धनकवडी) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत वारंवार घडला आहे. पुढील तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत.

Pune Crime Branch | पुणे : महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या शिक्षकाला गुन्हे शाखेकडून अटक

Related Posts