IMPIMP

Pune Navale Bridge Accident | दुर्दैवी ! नवले पुलाजवळील अपघातात 15 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा मृत्यू

by nagesh
Pune – Navale Bridge Accident | bike rider dies in two accidents in navale bridge area seven people were injured pune crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Navale Bridge Accident | पुण्यातील मुंबई-बंगलोर महामार्गावर (Mumbai-Bangalore Highway) नवले ब्रीज जवळ (Pune Navale Bridge Accident) आज सकाळी पुन्ह भीषण अपघात झाला. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने तो वेगाने पाठीमागे गेला आणि काही वाहनांना जाऊन धडकला. नवले ब्रीज जवळ झालेल्या या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तिघांमध्ये चेतन सोळंकी (Chetan Solanki) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुळचा धुळ्याचा असलेला चेतन सोळंकी हा पुण्यातील एका कंपनीत कामाला आहे.
चेतनचे अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी लग्न (Got Married Just 15 Days Ago) झाले होते.
नव्या नवरीला घेऊन तो पाच दिवसांपूर्वी पुण्यात आला होता. नेहमीप्रमाणे आज सकाळी तो कामावर जाण्यासाठी निघाला होता.
गाडीची वाट पाहात तो मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले ब्रीज जवळ उभा होता. कंपनीची गाडी त्याला नेण्यासाठी येण्यापूर्वीच ब्रेकफेल झालेला कंटनर काळ बनून आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

चेतनचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. चेतनला पाहण्यासाठी कुटुंब ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) पोहोचले. मृतदेहाचे दोन तुकडे झालेल्या चेतनला ओळखणंही कठीण झाले. त्याच्या पश्चात दोन बहिणी (Two sister) असून एका बहिणीचे लग्न झाले आहे. तर दुसऱ्या बहिणीचे लग्न अद्याप झालेले नाही. तिच्या लग्नाची जबाबदारी चेतन याच्यावर होती. चेतनचा अपघातात मृत्यू (Accidental Death) झाला आहे हे त्याच्या पत्नीला कसे सांगायचे असा प्रश्न नातेवाईकांसमोर आहे. (Pune Navale Bridge Accident)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे.
सिंहगड पोलीस ठाण्यात (Sinhagad Police Station) अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस फरार कंटेनर चालकाचा शोध घेत आहेत.

 

Web Title : Pune Navale Bridge Accident | young man who got married just 15 days ago died accident near navale bridge pune

 

हे देखील वाचा :

Omicron Covid Variant | केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय ! दिल्लीत पुन्हा निर्बंध लागू; शाळा-कॉलेज, थिएटर्स पुन्हा बंद

Pune Corona | पुणे शहरात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 171 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Anti Corruption Bureau Pune | पुण्यात वॉरंट रद्द करण्यासाठी 2 हजाराची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts