IMPIMP

Pune News | पुणेकरांची चिंता वाढली ! कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये आढळली नवी बुरशी

by nagesh
Europe Corona | Corona erupts again in Europe! In Germany, more than 73,000 new Korans have been infected so far

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  पुण्यात (Pune News) कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने पुणेकरांना दिलासा मिळत असतानाच पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कोरोनावर मात करुन बरे झालेल्या रुग्णांमध्ये (covid recovered patients) साईड इफेक्टस दिसून येत होते. हे पोस्ट कोविड म्हणजे म्युकरमाकोसि (mucormycosis (Black Fungus) होते. कोविड सोबत ब्लॅक फंगस आटोक्यात आला असतानाच आता पुण्यातील (Pune News) रुग्णांमध्ये नवी बुरशी (fungal infection) आढळून आली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मागील तीन महिन्यात या नव्या बुरशीचे पुण्यामध्ये (Pune News) चार रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. कोरोना संक्रमणातून बहेर पडलेल्या रुग्णाला सौम्य ताप आणि पाठदुखीच्या तीव्र वेदना होत होत्या. त्यांच्या पाठदुखीसाठी त्यांनी पाठ आणि कंबरेचे स्नायू शिथिल करणाऱ्या आणि नॉनस्टेरॉइडल (nonsteroidal) अँटी-इफ्लेमेटरी (anti-inflammatory) औषधांनी उपचार केले. मात्र त्यांना कसलाच गुण आला नाही. त्यानंतर त्यांनी पाठीचा एमआरआय (MRI) केला असता त्यांना पाठीच्या मणक्याला स्पॉन्डिलोडायसिटिस (Spondylodysis) हा आजार असल्याचे निष्पन्न झाले. तिथे त्यांच्या हाडामध्ये एक प्रकारच्या बुरशीची वाढ होत असल्याचं निदान डॉक्टरांकडून करण्यात आलं.

वैद्यकीय भाषेत याला एस्परगिलस ऑस्टियोमायलाईटिस (Aspergillus osteomyelitis) म्हटलं जातं. हा एक प्रकारे पाठीच्या मणक्याचा क्षयरोगाचा (spinal tuberculosis) प्रकार आहे. या बुरशीजन्य संसर्गाचे निदान करणे खूप कठीण आहे. कारण हे पाठीच्या मणक्यातील पोकळीत आढळून येतो. या प्रकरारचा बुरशीजन्य संसर्ग कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांच्या तोंडात आढळतो. फुफ्फुसातही बुरशी सापडण्याचे हे अत्यंत दुर्मिळ प्रकरण असल्याचे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे (Dinanath Mangeshkar Hospital) संसर्गजन्य रोग तज्ज्ञ परिक्षित प्रगाय (Parikshit pragya) यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती सांगितले.

तीन महिन्यापूर्वी आढळला पहिला रुग्ण

ऑस्टियोमायलाईटिसचा पहिला रुग्ण तीन महिन्यांपूर्वी आढळून आला. त्यानंतर आतापर्यंत चार रुग्ण आढळून आले आहेत. या चारही रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Web Title: Pune News | covid recovered patients facing fungal infection spinal tuberculosis 4 cases reported in pune city

हे देखील वाचा :

Chitra Wagh | चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल, म्हणाल्या – ‘प्रियंका गांधी पुण्याच्या घटनेवर गप्प का?’

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांची अजित पवारांवर टीका, म्हणाले – ‘…तर रॉयल्टी म्हणून त्यांना 200 ते 300 कोटी सहज मिळतील’

PM Gati Shakti | ‘गतीशक्ती’ योजनेतून कसे होईल शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट, जाणून घ्या सर्वकाही

Related Posts