IMPIMP

Pune News | पुण्यातील हवेली प्रांत अधिकारी बारवकर यांची तडकाफडकी बदली

by nagesh
Pune News | sachin barwakar punes haveli province officer transfered

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | पुण्यातील हवेली प्रांत अधिकाऱ्याची (Haveli Province Officer) तडकाफडकी बदली करण्यात आल्याचं समोर आलं आहे. हवेली प्रांत अधिकारी सचिन बारवकर (Sachin Barwakar) यांचा ३ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला नसतानाच ही बदली करण्यात आली आहे. बारवकर यांची बदली सांगली जिल्हाधिकारी कार्यालय (Sangli) भूसंपादन अधिकारी म्हणून करण्यात आलीय. दरम्यान, नव्या हवेली प्रांत अधिकाऱ्याची नेमणूक केली नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

हवेलीचे प्रांत अधिकारी सचिन बारवकर (Sachin Barwakar) यांना प्रांत या पदावर २ वर्षांचाच कार्यकाळ झाला आहे. मात्र, बदलीसाठी पात्र नसताना
शासनाने जुनी चौकशी उकरून काढत ते कारण दाखवत बदली केली आहे. सचिन बारवकर यांच्या बदलीमुळे मात्र महसुल विभागातील
(Department of Revenue) मुदत अगोदरच अधिका-यांच्या बदल्या करण्यात येत असल्याचा प्रकारच्या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे. दरम्यान, नवीन हवेली प्रांत अधिकारी म्हणून कोणाची नेमणूक होणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

दरम्यान, मुख्यतः म्हणजे महसूल विभागात क्रिम पोस्टींगसाठी (Cream posting)
अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक चढाओढ होते. मात्र, मागील काही वर्षांमध्ये असे पोस्टींग मिळविण्यासाठी मुदती अगोदरच बदल्या केल्या जात आहेत. याचे प्रमाण देखील वाढले आहे. राजकारणी लोकांची हातमिळवणी करून अधिकारी सर्वाधिक रक्कामांची उलथापालथ करून अशा क्रिम पोस्टींगसाठी प्रयत्न करताना दिसतात.

 

Web Title : Pune News | sachin barwakar punes haveli province officer transfered

 

हे देखील वाचा :

Shivsena and Congress | वेळ संपली तरीही मुख्यमंत्र्यांकडून प्रचार: कॉंग्रेस नेत्याची सेनेच्या आमदाराविरुद्ध हायकोर्टात याचिका

Rashmi Shukla | रश्मी शुक्लांचा अहवाल सीबीआयला देण्यास राज्य सरकार ‘रेडी’

Jan Ashirwad Yatra | नारायण राणेंनी शिवसेनेवर टीका करणं टाळलं

 

Related Posts