IMPIMP

Shivsena and Congress | वेळ संपली तरीही मुख्यमंत्र्यांकडून प्रचार: कॉंग्रेस नेत्याची सेनेच्या आमदाराविरुद्ध हायकोर्टात याचिका

by nagesh
shivsena and congress | congress mohammed arif naseem khan election petition against shiv sena mla dilip lande uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Shivsena and Congress | २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत चांदीवली मतदारसंघात प्रचाराची वेळ संपली असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच आमदार दिलीप लांडे यांचा प्रचार केला होता. त्यासंदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी उच्च न्यायालयात (High Court) निवडणूक याचिका दाखल केली असून यावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत चांदीवली मतदारसंघातून ४०९ मतांनी लांडे यांच्याकडून खान हे पराभूत (Shivsena and Congress) झाले होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असे म्हंटले आहे की, २०१९ विधानसभा निवडणूकीसाठी २१ ऑक्टोबर २०१९ ला मतदान झाले. मात्र,
आदल्यादिवशी म्हणजे २० ऑक्टोबर २०१९ रोजी शिवसेना पक्षप्रमुख व विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सध्याचे परिवहनमंत्री अनिल परब व अभिनेते
मिलिंद गुणाजी यांनी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या प्रचाराच्या मुदतीनंतरही प्रचार केला होता.
प्रचारादरम्यान आपण ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचे खोटे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले, असेही खान यांनी या याचिकेत म्हटले आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्यक्ष मतदानाला ४८ तास उरले असताना प्रचार करता येत नाही.
पण हा नियम मोडून ठाकरे यांनी प्रचार केला.
त्यामुळे बेकायदेशीर निवडणूक प्रक्रियेमुळे लांडे ४०९ मतांनी निवडून आल्याचे खान यांनी याचिकेत म्हंटले आहे.

 

Web Title : shivsena and congress | congress mohammed arif naseem khan election petition against shiv sena mla dilip lande uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Rashmi Shukla | रश्मी शुक्लांचा अहवाल सीबीआयला देण्यास राज्य सरकार ‘रेडी’

Jan Ashirwad Yatra | नारायण राणेंनी शिवसेनेवर टीका करणं टाळलं

Extortion Case | पोलीस निरीक्षक माने मला त्रास द्यायचा; गुरुशरणसिंह चौहानच्या पत्नीने केले गंभीर आरोप

 

Related Posts