IMPIMP

Jan Ashirwad Yatra | नारायण राणेंनी शिवसेनेवर टीका करणं टाळलं

by nagesh
Sindhudurg District Bank Election Result | shivsena leader satish sawant defeated in sindhudurg district bank election

रत्नागिरी : सरकारसत्ता ऑनलाइन –  Jan Ashirwad Yatra | बागायतदारांना सरकारी मोबदला कसा देता येईल यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. कोकणातील आंबा बागायतदार अडचणीत येत आहेत. पण तुम्हाला शब्द देतो की तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावणार आहे. तुमच्यावर आत्महत्येची वेळ येऊ देणार नाही, असा शब्द नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिला. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी रत्नागिरीत (ratnagiri) जन आशीर्वाद यात्रे (Jan Ashirwad Yatra) दरम्यान हे वक्तव्य केले आहे. मात्र, यावेळी त्यांनी शिवसेनेवर (Shivsena) टीका करणं टाळलं.

कोकणातील आंबा बागायतदारांना (mango gardener) कोणतीही अडचण येऊ देणार नाही.
याची काळजी मी घेणार आहे. यावर चर्चा करुन नक्कीच पुढची दिशा ठरवणार असल्याचे देखील नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले, मी आशीर्वाद घेण्यासाठी रत्नागिरीत आलो आहे.
तेव्हा आंबा बागायतदार भेटु इच्छीत आहेत, असे माला सांगण्यात आले.
त्यांची भेट घेतली त्यांच्या समस्याबाबत त्यांनी माहिती दिली.
मी एवढेच सांगिन की, तुमचे निवेदन मिळाले असून याचा अभ्यास करुन बागायतदारांना सरकारकडून (Government) कसा मोबदला मिळावा आणि मिळेल यासाठी नक्की प्रयत्न करीन.
एकाने सांगितले मदत मिळाली नाही तर आम्हाला आत्महत्या (Suicide) करावी लागेल.
पण मी तुम्हाला शब्द देतो की हे वेळ मी येऊ देणार नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

देशाचा कॅबिनेट मंत्री असलो तरी कोकणातून गेलो आहे.
हा सामाईक प्रश्न मी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे.
आंबा बागायतदारांच्या कर्जाचे पुनर्रगठण करण्यात आले.
मात्र, त्याचा फायदा झालेला नाही. त्यांना पुन्हा कशा पद्धतीने आर्थिकदृष्ट्या उभा करता येईल,
यादृष्टीने माझा प्रयत्न असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मला मंत्रीपद देताना, सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रीपद दिले. यापुढे फुड प्रोसेसिंग एक विभाग आहे.
अधिकाऱ्याला घेऊन बागायतदारांना कसा दिलासा देता येईल आणि तुमचे प्रश्न कसे सोडवता येतील यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे नारायण राणे यांनी जनसंवाद यात्रेदरम्यान सांगितले.

 

Web Title : Jan Ashirwad Yatra | narayan rane jan ashirwad yatra speech mango gardener

 

हे देखील वाचा :

Extortion Case | पोलीस निरीक्षक माने मला त्रास द्यायचा; गुरुशरणसिंह चौहानच्या पत्नीने केले गंभीर आरोप

Pune Crime | ‘त्या’ खासगी सावकाराविरूध्द हडपसर पोलीस ठाण्यात आणखी एक खंडणीचा गुन्हा

BJP vs Shiv Sena | CM उद्धव ठाकरे, फडणवीसांची बंद दाराआड चर्चा

Burglary in Pune | भारती विद्यापीठ, विमानतळ, खडकी अन् सिंहगड रोड परिसरात घरफोडया, 4 घटनांमध्ये लाखोंचा ऐवज लंपास

 

Related Posts