IMPIMP

Pune News | विध्यार्थी हे देशाचा नविन इतिहास घडवणारी नविन पिढी – अनुराधा ओक

by nagesh
Pune News | Students are the new generation making a new history of the country - Anuradha Oak

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | कोरोना काळात शिक्षकांण शिवाय यश संपादन करणारे विद्यार्थी हे देशाचा नवीन इतिहास घडवणारी नवीन पिढी म्हणावे लागेल गेले दीड वर्षापासून संपूर्ण जग हे कोरोना सारख्या महामारीला सामोरे जात आहे , यामध्ये अनेक शाळा, विद्यालय बंद ठेवण्यात आले यामुळे सर्वच शिक्षक व विद्यार्थ्यांची ताटातूट झाली आणि ऑनलाईन शिक्षण घेण्याचा पर्याय सर्वांना स्वीकारावा लागला , यामध्ये महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांण शिवाय विद्यार्थ्यांनी मनापासून शिक्षणावर आपले लक्ष केंद्रित केले आणि यामध्ये सर्वांनीच भरभरून यश संपादन केले, त्यामुळे या विद्यार्थ्यांचे खरोखरच जेवढे कौतुक करू तेवढे कमीच आहे त्यांनी दाखविलेल्या जिद्दीला , मेहनतीला मानाचा मुजरा व पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा असे मत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय सचिव अनुराधा ओक (Anuradha Oak, Pune Divisional Secretary, Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) यांनी व्यक्त (Pune News) केले.

 

 

या वेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक व शिक्षण मंडळाचे सदस्य बाबुराव चांदेरे (corporator baburao chandere) यांनी यावेळी सांगितले की पुणे महानगरपालिकेच्या
(Pune Corporation) वतीने इयत्ता दहावी व बारावी मध्ये 80 टक्के च्या पुढे गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी शिष्यवृत्ती मिळते आणि बाणेर बालेवाडी या परिसरातील सर्वात अधिक विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवितात याचा खरंच मला अभिमान आहे.
आज पर्यंत बाणेर बालेवाडी या परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करत होतो परंतु आता
पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या सुस व म्हाळुंगे गावातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा
देखील गौरव करताना आज मला खूप मोठा अभिमान वाटत आहे असे मत चांदेरे यांनी यावेळी व्यक्त केले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) प्रभाग क्र. ९, बाणेर- बालेवाडी – सुस – म्हाळुंगे (Baner – Balewadi – Sus – Mahalunge) यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी इयत्ता १० वी व १२ वी तील ” गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ ” या कार्यक्रमाचे आयोजन बाणेर (Baner) येथील बंटारा भवन
(Bantara Bhavan) या ठिकाणी करण्यात आले होते या कार्यक्रमावेळी अनुराधा ओक बोलत होत्या.

 

 

या कार्यक्रमात बाणेर – बालेवाडी- सुस- म्हाळुंगे या परिसरातील इयत्ता १० वी व १२ वी तील सुमारे ७५९ गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रदीप पाडाळे, युवराज कोळेकर, निलेश पाडाळे,
श्री. पांडुरंग पाडाळे, श्री. सागर चिव्हे , श्री. अजिंक्य निकाळजे , श्री. समीर कोळेकर , सौ. कविता बोरावके , युवा कार्यकर्ते समीर चांदेरे , चेतन बालवडकर ,श्री. अर्जुन शिंदे , श्री.अर्जुन ननावरे, श्री.मनोज बालवडकर ,श्री.चंद्रकांत काळभोर ,श्री. संजय ताम्हाणे ,सौ. सुषमा ताम्हाणे, श्रीमती. वैशाली कलमानी,
सौ. माधुरी इंगळे, सौ. रोहिणी सुतार, डॉ. मीनाताई विधाळे ,डॉ. वाघचौरे , सौ. राखी श्रीराव ,
सौ. प्राची सिद्धकी,
श्री. शेखर सायकर , श्री. प्रणव कळमकर, श्री. सुशील मुरकुटे , कु.ओंकार रणपिसे ,
कु.प्राजक्ता ताम्हाणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

 

 

या कार्यक्रमाचे आयोजन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक ,
पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे सदस्य बाबुराव चांदेरे व डॉ. सागर बालवडकर यांनी केले होते .
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  पुनमताई विधाते आणि सूत्रसंचालन नितीन कळमकर यांनी केले .

 

Web Title : Pune News | Students are the new generation making a new history of the country – Anuradha Oak

 

हे देखील वाचा :

Antilia Case | NIA चार्जशीटमध्ये माजी कमिश्नर परमबीर सिंह यांचे नाव नाही, मात्र सायबर एक्सपर्टच्या जबाबातून प्रश्न उपस्थित

Mansukh Hiren Murder Case | ‘NIA’ चा आरोपपत्रात मोठा खुलासा ! प्रदीप शर्मांना दिली होती मनसुख हिरेनच्या हत्येची जबाबदारी; वाझेनं दिली होती मोठी रक्कम

Rain in Maharashtra | मुंबई अन् पुण्यासह ‘या’ 11 जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्हयाला रेड अलर्ट

 

Related Posts