IMPIMP

Pune News | उंड्री पिसोळी गाव कोंढव्याच्याच हद्दीत राहावे : राजेंद्र भिंताडे

by nagesh
Pune News | Undri Pisoli village should be within the boundaries of Kondhwa: Rajendra Bhintade

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune News | कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील (Kondhwa Police Station) उंड्री पिसोळी गाव नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या काळेपडळ (kalpadal) पोलीस ठाण्यात जोडू नये अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते राजेंद्र भिंताडे (Rajendra Bhintade) यांनी केली आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन पुणे शहर पोलिसांना दिले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

उंड्री पिसोळी (undri pisoli) हे गाव कोंढवा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच दोन किलोमीटरवर आहे. तर नव्याने होऊ घातलेल्या
काळेपडळ पोलीस ठाण्यापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे. वाढत्या नागरीकरणामुळे येथील जनतेला लवकरात लवकर पोलीस मदत
मिळण्याकरता काळेपडळ पोलीस ठाणे अंतर्गत या गावाचा समावेश करण्यात येऊ नये, याकरीता ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. वाहतुकीच्या दृष्टीने
देखील नवीन पोलिस ठाण्याची हद्द लांब पल्ल्याची आहे. या गावाचा समावेश नवीन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये झाल्यास लोकांना तासन तास रेल्वे
फाटकावर थांबून पोलीस ठाण्यापर्यंत जावे लागणार आहे. यामुळे जनतेला पोलिस मदत मिळण्यास विलंब होणार आहे. तसेच जनतेचा वेळ व पैसा
नाहक खर्च होणार आहे.

शासनाच्या या निर्णयाला स्थगिती देण्यासंदर्भातचे निवेदन पुणे शहर पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांच्या वतीने अप्पर पोलीस
आयुक्त जालिंदर सुपेकर (Addl CP Jalinder Supekar) यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी भाजपचे प्रभाग अध्यक्ष दादासाहेब कड, युवा मोर्चाचे
अध्यक्ष अविनाश टकले, ओबीसी सेलचे अध्यक्ष ओंकार होले, विजय टकले व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Web Title : Pune News | Undri Pisoli village should be within the boundaries of Kondhwa: Rajendra Bhintade

Related Posts