IMPIMP

Pune News | पुण्यातील श्री गरुड गणपती मंडळातर्फै 100 बेघर, वंचित घटकांचे लसीकरण

by nagesh
Pune News | Vaccination of 100 homeless, deprived sections by Shri Garud Ganpati Mandal in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  – Pune News | समाजातील बेघर, निर्वासित, भिक्षेकरी अशा घटकांतील 100 जणांना कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्याचा उपक्रम लक्ष्मी रस्त्यावरील श्री गरुड गणपती (Shri Garud Ganpati on Lakshmi Road) मंडळात गुरुवारी (Pune News) पार पाडला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

या उपक्रमात भिडे पुलाजवळील (bhide bridge pune) नदीपात्रात काम करणारे मेट्रो प्रकल्पातील मजूर, तेथील फुगे-खेळणी विक्रेते, छोट्या हॉटेलमधील कामगार अशा शंभर जणांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला. मंडळाच्यावतीने सर्वांना दुसऱ्या डोसची आणि सर्टीफिकेट देण्याची व्यवस्थाही केली जाणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष सुनील कुंजीर (Shri Garud Ganpati Mandal President Sunil Kunjir) यांनी सांगितले.

 

कोरोना साथ नियंत्रणात आणण्यासाठी समाजातील वंचित, दुर्बल घटकांनाही लसीकरण मोहीमेत सहभागी करून घेणे आवश्यक आहे
आणि त्यादृष्टीकोनातून मंडळाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा उपक्रम हाती घेतला,
महापालिकेच्या आरोग्य खात्याचे सहकार्य लाभले, असे कुंजीर यांनी सांगितले.
महापालिकेचे समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण आणि डॉ. ऊजवणकर यांनी मंडळाला भेट दिली आणि उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले.
सर्व शासकीय नियम पाळून हा उपक्रम राबविण्यात आला.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

Web Title : Pune News | Vaccination of 100 homeless, deprived sections by Shri Garud Ganpati Mandal in Pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कुख्यात गुंड गोविंदसिंग टाक टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई, आतापर्यंत 55 गँगवर MCOCA अ‍ॅक्शन

EPFO | पीएफ खातेधारकांना फ्री मिळते ‘ही’ 7 लाख रुपयांची सुविधा, जाणून घ्या केव्हा आणि कसा करावा क्लेम ?

Sachin Vaze | सचिन वाझेनं अनिल देशमुखांच्या सचिवाकडे दिल्या होत्या पैशांनी भरलेल्या 16 बॅगा, आरोपपत्रात खुलासा

 

Related Posts