IMPIMP

Pune Pimpri Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे 11 कोटीची खंडणीची मागणी

by nagesh
Pune Pimpri Crime | demand for rs 11 crore ransom from builder of pimpri chinchwad of pune

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Pimpri Crime | विकसन करारनाम्यात (Development Agreement) बांधकामाची जागा महार वतनाची (Mahar Vatan) असल्याचा उल्लेख न करता बांधकाम व्यावसायिकाची (Builder) फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच पाच हजार चौरस फूट वाढीव बांधकाम करुन द्यावे किंवा 10 कोटी 85 लाख रुपयांची खंडणी (Ransom) देण्याची मागणी करणाऱ्या दोघांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आयपीसी 420, 384, 34 नुसार चंदु लक्ष्मणदास रामनानी (Chandu Laxmandas Ramnani) व किरण चंदु रामनानी (Kiran Chandu Ramnani) यांच्यावर गुन्हा दाखल (Pune Pimpri Crime) केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत एका 35 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने रविवारी (दि.15) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चंदु लक्ष्मणदास रामनानी व किरण चंदु रामनानी (दोघे रा. प्लॉट नं. 8, सुखवानी पॅराडाईजचे समोर, पिंपरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 27 ऑगस्ट 2021 रोजी हिंजवडी फेज एक (Hinjewadi Phase One) येथील परसीस्टंट कंपनीच्या बाजूला असलेल्या ज्युस सेंटरवर घडला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत.
लिगसी टावर असोसिएट (Legacy Tower Associate) ही नंतर रुपांतर झालेली लिगसी टावर्स असोसिएट एलएलपी यांच्यातर्फे रावेत येथील सर्वे नं. 106 येथील 15 गुंठे क्षेत्रात बांधकाम केले जात आहे.
आरोपी चंदु रामनानी व किरण रामनानी यांनी संगनमत करुन संबंधित जागा महार वतनाची असल्याचा उल्लेख न करता फिर्यादी यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने लवपून ठेवून 18 लाख रुपयांचे नुकसान केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

विकसन करारनाम्यानुसार देय बांधकामापेक्षा वाढीव बांधकाम पाच हजार चौरस फूट किंवा 10 कोटी 85 लाख रुपयांची खंडणी मागितली.
तसेच पोलिसांत तक्रार करण्याची आणि बँकेकडून करण्यात येणारे फायनान्स बंद करण्याची धमकी (Threat) आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख (API Sandeep Deshmukh) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | demand for rs 11 crore ransom from builder of pimpri chinchwad of pune

 

हे देखील वाचा :

CP Sanjay Pandey | गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय

Indian Railways | काय सांगता ! होय, ‘या’ रेल्वे ट्रॅकवर आज देखील ब्रिटिशांची मालकी; भरावा लागतो इतका TAX

Pune Crime | धक्कादायक ! वडिलच मुलीला दाखवत होते पोर्नोग्राफी व्हिडिओ; बहिणीने काढले अंतवस्त्रातील फोटो व व्हिडिओ, आई वडिल, बहिणीवर FIR

 

Related Posts