IMPIMP

Indian Railways | काय सांगता ! होय, ‘या’ रेल्वे ट्रॅकवर आज देखील ब्रिटिशांची मालकी; भरावा लागतो इतका TAX

by nagesh
Indian Railways | this railway track in india is still owned by the british tax has to be paid every year

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Indian Railways | भारतीय रेल्वे (Indian Railways) ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. देशात दिवसभरात जवळपास हजारो ट्रेन प्रवास करत असतात. त्याचबरोबर लाखोंच्या पटीत प्रवासी प्रवास करताना पाहायला मिळतं. दरम्यान, एका महत्वाच्या माहितीनुसार भारतातील एक रेल्वे ट्रॅक (Railways Track) आजदेखील ब्रिटिशांच्या ताब्यात आहे. तसेच, ट्रॅकवर ट्रेन चालवण्यासाठी भारतीय रेल्वे ब्रिटनच्या एका खासगी कंपनीला वर्षाला ठराविक टॅक्स देते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हा रेल्वे ट्रॅक कुठे असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तो महाराष्ट्रातील अमरावती (Amravati) जिल्ह्यात आहे. त्याला ‘शकुंतला रेल मार्ग’ (Shakuntala Railways Track) असे म्हणतात. तर, 1903 साली क्लिक निक्सन या ब्रिटिश कंपनीच्या वतीने हा ट्रॅक तयार करण्यास सुरूवात झाली. 1916 मध्ये पूर्ण झाले. ही कंपनी आज सेंट्रल प्रोव्हिन्सेस रेल्वे कंपनी (Central Provinces Railway Company) म्हणून ओळखली जातेय. तेव्हा अमरावतीचा परिसर कापसासाठी देशात प्रसिद्ध होता. मुंबई बंदरात कापूस नेण्यासाठी ब्रिटिशांनी हा ट्रॅक बांधला होता. तेव्हा केवळ खाजगी कंपन्याच रेल्वेचे जाळे पसरवण्याचे काम करत असते. हा ट्रॅक ब्रिटिशांच्या ताब्यात आहे. (Indian Railways)

 

दरम्यान, भारतीय रेल्वे ब्रिटनच्या या खासगी कंपनीला वर्षाला एक कोटी 20 लाख रुपये देते.
परंतु, दरवर्षी कर देऊनही हा ट्रॅक अतिशय जीर्ण झाला आहे.
मागील साठ वर्षांपासून त्याची डागडुजीही झाली नसल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आलेय.
अशा परिस्थितीमुळे त्यावर चालणाऱ्या जेडीएम मालिकेतील डिझेल लोको इंजिनचा कमाल वेग 20 किलोमीटर प्रतितास ठेवला गेला आहे.
त्याचबरोबर महत्वाचे म्हणजे या रेल्वे मार्गावरील सिग्नल आजही ब्रिटीशकालीन आहेत.
या मार्गाहून धावणाऱ्या शकुंतला एक्सप्रेस (Shakuntala Express) ट्रेनमध्ये रोज हजाराहून जादा लोक प्रवास करत असतात.

 

Web Title :- Indian Railways | this railway track in india is still owned by the british tax has to be paid every year

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! वडिलच मुलीला दाखवत होते पोर्नोग्राफी व्हिडिओ; बहिणीने काढले अंतवस्त्रातील फोटो व व्हिडिओ, आई वडिल, बहिणीवर FIR

Rupali Chakankar on Sadabhau Khot | रुपाली चाकणकरांचा सदाभाऊ खोतांवर जोरदार निशाणा; म्हणाल्या – ‘अशी कीड योग्यवेळी ठेचली पाहिजे’

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलियस, स्मार्ट लायन्स् संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !

 

Related Posts