IMPIMP

Pune PMC Election 2022 | मतदार याद्यांमध्ये प्रचंड त्रुटी ! त्रुटी दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे वेळ वाढवून मागितला – महापालिका आयुक्त पथा प्रशासक विक्रम कुमार

by nagesh
Pune PMC - Uruli Devachi - Fursungi | The demand to create an independent municipality or municipality excluding villages is 'political'! Pune PMC News Uruli Devachi - Fursungi Hadapsar & Wagholi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune PMC Election 2022 | महापालिका निवडणुकीसाठी (Pune Municipal Corporation Elections 2022) जाहीर करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीत (Voting List Pune) मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळून आल्या आहे. सुमारे ४ हजार २७३ हरकती आणि सुचना नोंदविण्याची मुदत वाढविण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभुमीवर महापालिकेच्या निवडणुक विभागाने राज्य निवडणुक आयोगाकडे ही मुदत वाढवून मिळावी अशी मागणी केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

प्रभाग निहाय प्रारुप यादीवर हरकती आणि सुचना नोंदविण्यासाठी ३ जुलैपर्यंत मुदत होती. शेवटच्या दिवशी दोन हजाराहून अधिक हरकती आणि सुचना दाखल झाल्या आहे. मतदार यादीतील त्रुटीबाबत यापुर्वी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली होती. तर सोमवारी आरपीआयचे शहराध्यक्ष शैलेश चव्हाण (RPI Shailesh Chavan), माजी उपमहापौर सुनीता वाडेकर (Sunita Wadekar), डॉ. सिध्दार्थ धेंडे (DR Siddharth Dhende), प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव (Balasaheb Janrao), पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर (Parshuram Wadekar) यांनी आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner and Administrator Vikram Kumar) यांची भेट घेऊन त्रुटीविषयी माहीती दिली. तसेच हरकती आणि सुचना नोंदविण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. या मागणीला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन, राज्य निवडणुक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी केली जाणार असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितल्याचे डॉ. धेंडे यांनी पत्रकार परीषदेत नमूद केले. मुख्य निवडणुक अधिकारी यशवंत माने (Chief Election Officer Yashwant Mane) यांनी देखील निवडणुक आयोगाला पाठविण्यात आलेल्या पत्रासंदर्भात दुजोरा दिला आहे. (Pune PMC Election 2022)

 

अनेक प्रभागातील मतदारांची नावे मोठ्या प्रमाणावर दुसर्‍या प्रभागाच्या मतदार यादीत (PMC Prabhag Ward Voting List) गेले आहे. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींची नावे वेगवेगळ्या तीन प्रभागांच्या मतदार यादीत समाविष्ट केली गेली आहेत. तसेच ट्रु व्होटर हे ऍपही योग्य पद्धतीने काम करीत नाही, यामध्येही त्रुटी असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या निदर्शानास आणून दिल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले. (Pune PMC Election 2022)

 

राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेच्या निवडणुक विभागाला या प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीवर आलेल हरकती आणि सुचनांची पडताळणी करून अंतिम मतदार यादी ही ९ जुलै रोजी जाहीर करावी लागणार आहे. परंतु मोठ्याप्रमाणावर हरकती आणि सुचना आल्याने त्याची पडताळणी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणार का याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील प्रभागांच्या प्रारुप मतदार याद्यांवर जास्त हरकती आणि सुचना आल्या आहेत, अशा ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल असे अतिरीक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी स्पष्ट केले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मुदत वाढवून मिळावी यासाठी आयोगाला पत्र – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक

विधानसभेच्या मतदार याद्यांमध्ये अनेक चुका आढळून आल्या आहेत. मतदारांचे आधार कार्ड नोंद नसणे, छायाचित्र नसलेल्या मतदारांच्याही नोंदी आहेत.
पत्ता बदल झाल्यानंतरही जुन्याच ठिकाणी नावे आहेत. तर एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या याद्यांमध्ये असल्याच्याही तक्रारी आहेत.
मतदार याद्यांमधील दुरूस्तीचे अधिकार हे जिल्हाधिकारी कार्यालयाला आहेत. त्यामुळे या त्रुटींबाबत जिल्हाधिकार्‍यांसोबत बोलणे झाले आहेत.
तसा पत्रव्यवहारही करण्यात येणार आहे. मतदार याद्यांवरील हरकती व सूचनांचे प्रमाण अधिक असल्याने मतदार याद्या अधिकाअधिक अचूक करण्यासाठी वेळ लागणार आहे.
निवडणुक आयोगाने यासाठी वेळ वाढवून द्यावा, असे पत्र राज्य निवडणूक आयोगाला पाठविले आहे.
तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांसोबत याबाबत चर्चा देखिल केली आहे,
अशी माहिती महापालिकेचे आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली.

 

Web Title :-  Pune PMC Election 2022 | Huge error in voter lists! Asked to extend the time to the Election Commission to rectify the error – Municipal Commissioner Patha Administrator Vikram Kumar

 

हे देखील वाचा :

Pune PMC Election 2022 | राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर प्रभाग रचना बदलण्याची शक्यता कमीच ! स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सप्टेंबरमध्येच होतील – प्रशासकीय अधिकार्‍यांना विश्‍वास

Pune Crime | गुन्हे शाखेकडून 25 लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नोबेल हॉस्पिटल जवळ कारवाई

Pune Crime | वारजे माळवाडी परिसरात गुन्हे शाखेकडून 20 किलो गांजा जप्त

 

Related Posts