IMPIMP

Pune Police Inspector Transfer | वादग्रस्त ठरलेल्या ‘त्या’ पोलीस निरीक्षकाची अखेर बदली

by nagesh
Pune ACP Transfer | Acp vijaykumar palsule appointed in traffic branch while acp rajendra salunke appointed in special branch in pune city police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Police Inspector Transfer | इंटरेरियर डेकोरेटरला मारहाण करुन कानाला पिस्तुल लावणे, वाहनचालकाला शिवीगाळ करणे असे आरोप असलेल्या ‘त्या’ वादग्रस्त ठरलेल्या पोलीस निरीक्षकाची अखेर बदली करण्यात (Pune Police Inspector Transfer) आली आहे. पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Rajesh Puranik) यांची वाहतूक शाखेतून विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Jalindar Supekar) यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

घराचे इंटेरियर डेकोरेशनचे काम व्यवस्थित झाले नाही म्हणून राजेश पुराणिक यांनी इंटेरियर डेकोरेटरला कार्यालयात बोलावून तेथे त्याला मारहाण
केली व त्याच्या कानाला पिस्तुल लावले होते असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तसेच दिलेले पैसे परत मागितले होते. याप्रकरणी राजेश पुराणिक यांच्याविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाची चौकशी करण्यात येत असून तपासात जे निष्पन्न होईल, त्यानुसार पुढे कारवाई होईल, असे सांगितले होते.

 या प्रकरणानंतर विश्वास जाधव (वय 48, रा. भवानी पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली

होती. त्यावरुन राजेश पुराणिक यांच्यावर 322, 504, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचा मुलगा तन्मय हा नाना पेठेत सामान आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याची
अ‍ॅक्टिव्हा दुचाकी वाहतूक पोलिसांनी उचलून नेली. तक्रारदार हे समर्थ वाहतूक विभागात
(Samarth Traffic Division) गाडी सोडवण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक (Police Inspector Rajesh Puranik) यांना विनाकारण गाडी उचलून आणल्याबाबत विचारणा करुन मदत करण्याची विनंती केली.

त्यावेळी वाहतूक पोलीस कर्मचार्‍याने तन्मयने शिवी दिल्याची खोटी माहिती पुराणिक यांना दिली.
याचा राग आल्याने पुराणिक यांनी मुलगा तन्मय आणि तक्रारदार यांना शिवीगाळ करुन दमदाटी
करत मारहाण केली. तसेच मुलाच्या मोबाईलच्या स्क्रिनचे नुकसान करुन खोटा गुन्हा दाखल
करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. एका पाठोपाठ दोन गुन्हे दाखल झाल्याने शेवटी
शहर पोलीस प्रशासनाने राजेश पुराणिक यांची वाहतूक शाखेतून (Traffic Branch) विशेष
शाखेत बदली (Pune Police Inspector Transfer) केली आहे.

 

Web Title : Pune Police Inspector Transfer | police inspector rajesh puranik transfer

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | ‘या’ कर्मचार्‍यांची 35 हजार रुपयांपर्यंत वाढली Salary, सरकारने पूर्ण केली मोठी मागणी

Pune Crime | 10 % दराने व्याज वसूल करुन 2.5 लाखाची खंडणी उकळणार्‍या सावकारास आणि त्याच्या साथीदारांना खंडणी विरोधी पथकाकडून अटक

Gold Price Today | सोन्याचा भाव वाढला, चांदी सुद्धा महागली; जाणून घ्या नवीन दर

 

Related Posts