IMPIMP

Pune Rain | अग्निशामक दलाने केली 12 जणांची पावसात अडकलेल्या सुटका

by nagesh
Pune Rain | Firefighters rescued 12 people trapped in the rain

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Rain | सोमवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. त्यात
काही ठिकाणी लोक पाण्यात अडकले होते. अशा वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या १२ जणांची अग्निशामक दलाच्या (Fire Brigade) जवानांनी सुटका
केली. (Pune Rain)

 

मंगळवार पेठेतील स्वरुपवर्धिनीजवळ मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्यात एक कुटुंब अडकले होते. तेथील नागरिक पल्लवी जावळे यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे (Devendra Potphode) यांना कळविताच तेथे अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर (Pradeep Khedekar), तांडेल राजाराम केदारी, अनिल करडे व जवान छगन मोरे, शफीक सय्यद, हरिश बुंदेले, राजू जगदाळे, निलेश कर्णे, महेश गरड, मयुर कारले, चंद्रकांत मेनसे, राहुल जाधव, नवनाथ जावळे व चालक धीरज सोनावणे यांनी तेथील ३ मुली, १ महिला व १ पुरुष अशा ५ जणांना सुखरुप बाहेर काढले. तांडेल राजाराम केदारी यांनी लहान मुलींना खांद्यावर घेऊन बाहेर येताच स्थांनिकांनी त्यांचे आभार मानले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोंढवा खुर्द येथील भाजी मंडईजवळ एका ठिकाणी ७ नागरिक पाण्यामध्ये अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी रश्शीचा वापर करुन त्यांना बाहेर काढण्यात आले. कोंढवा खुर्द अग्निशमन जवान निलेश लोणकर, रवि बारटक्के, नारायण मिसाळ, सुरज माळवदकर, सागर इंगळे, अनिकेत गोगावले व चालक दिपक कचरे यांनी ही उत्तम कामगिरी केली. (Pune Rain)

 

आज पहाटे ४ वाजेपर्यंत शहरातील जवळपास २० ठिकाणी पाणी साचले होते. (येवलेवाडी स्मशानभूमीजवळ – सुखसागर नगर, अंबामाता मंदिर – कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड – रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ – सुखसागर नगर, डॉल्फिन चौक – बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर – हडपसर, गाडीतळ – शिवाजीनगर पोलिस मुख्यालय – मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम – कसबा पेठ, फिश मार्केट जवळ – कुंभार वाडा समोर – नारायण पेठ, मोदी गणपती – औंध, डिएव्ही स्कुल गल्ली – कसबा पेठ, पवळे चौक – कसबा पेठ, भुतडा निवास – पर्वती, मिञमंडळ चौक – गंज पेठ – भवानी पेठ येथे पाणी साचले होते.

 

पर्वती येथील रमणा गणपतीजवळ एका ठिकाणी भिंतीचा काही भाग पडला. ३ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या.
हडपसर येथील आकाशवाणी येथे रस्त्यावर तर चंदननगरमधील बिडी कामगार वसाहत येथे रिक्षावर झाड पडले.
पाषाण येथील लॉयला स्कुल येथे दुचाकीवर झाड पडले होते. त्यात एक दुचाकीस्वार जखमी झाला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Rain | Firefighters rescued 12 people trapped in the rain

 

हे देखील वाचा :

Satara Crime | रक्षकच बनला भक्षक… महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिसावर ‘पॉक्सो’ अंतर्गत FIR

Ajit Pawar | अजित पवारांनी सरकारला फटकारले, शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात आवाज उठवणार! सभेत सांगितला ‘ईडी’चा अर्थ

Ashish Shelar | ‘मशालीचा चटक बसला’ म्हणणाऱ्या ठाकरे गटाला आशिष शेलारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला “गणपत वाणी” आज…’

 

Related Posts