IMPIMP

Pune Rural Police | महिला पोलिसांना 8 तास ड्युटी ! पुणे ग्रामीणचे अधीक्षक डॉ. देशमुख यांचा ‘अभिनव’ उपक्रम

by nagesh
Pune Rural Police | 8 hours duty for women police! Pune Rural Superintendent Dr. Abhinav Deshmukh’s ‘innovative’ initiative

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Rural Police | पोलिसांना आठ तास ड्युटी कधी? असा सवाल नेहमी विचारला जातो. सरसकट सर्व
पोलिसांना आठ तास ड्युटी देणे शक्य नसल्याचे यापूर्वीच सिद्ध झालेले आहे. मात्र, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) यांनी एक अभिनव उपक्रम राबविला आहे. सर्व पोलिसांना नाही तर किमान महिला पोलिसांना आठ तास ड्युटी (Eight hours duty) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी 1 सप्टेंबर पासून केली जाणार आहे. महिला कुटुंबाला ही वेळ देऊ शकतील आणि त्यांची मानसिक स्थिती देखील उत्तम राहील असा या मागचा हेतू असल्याचे अधीक्षक अभिनव देशमुख यांनी ‘पोलीसनामा’ (Policenama Online) सोबत (Pune Rural Police) बोलताना सांगितले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

महिला कर्मचाऱ्यांनी (female employee) या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. सध्या स्त्री असो वा पुरुष सर्वच पोलिसांना 12 ते 14 तास कर्तव्य बजावावे लागते. यासोबतच सण-उत्सव राजकीय दौरे, आंदोलने आदी कार्यक्रमांमध्ये बंदोबस्त करावा लागतो. गंभीर गुन्हे (crime) घडल्यानंतर अधिक वेळ कर्तव्यावर हजर राहावे लागते. महिला कर्मचाऱ्यांना घरातील सर्व कामे उरकून पोलीस ठाण्यात येऊन हजेरी द्यावी लागते. बारा बारा तास काम करून घरी गेल्यानंतर देखील त्यांना घरची जबाबदारी पार पाडावी लागते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर (Health) देखील परिणाम होतो.

 

त्यांच्या मानसिक स्थितीचाही प्रश्न निर्माण होतो. त्यांची होणारी तारेवरची कसरत लक्षात घेता पुणे
ग्रामीण पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना आठ तासांची ड्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आला
आहे. याबाबतचे आदेश डॉ. देशमुख यांनी दिले असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास लवकरच पुरुषांनाही आठ तासांची ड्युटी देता येते का याबाबत विचार केला जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

 

Web Title : Pune Rural Police | 8 hours duty for women police! Pune Rural Superintendent Dr. Abhinav Deshmukh’s ‘innovative’ initiative

 

हे देखील वाचा :

Pune Anti Corruption | 5000 रुपयाची लाच घेताना शिरूर येथील भूकरमापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Parambir Singh | परमबीर सिंह यांनी भरला 50 हजाराचा दंड, जाणून घ्या प्रकरण

Nashik Crime | वाहनावर अशोकस्तंभ लावून लोकसेवक असल्याचे भासवणारा गजाआड, नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई

 

Related Posts