IMPIMP

Pune Vishrantwadi Crime | कोयत्याचा धाक दाखवून व्यावसायिकाला लुटले, एकाला अटक; विश्रांतवाडी भागातील घटना

by sachinsitapure
arrest

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Vishrantwadi Crime | दारु पिण्यासाठी व्यावसायिकाकडे पैशांची मागणी केली. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्याने कोयत्याचा धाक दाखवून दुकानातील गल्ल्यातील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेणाऱ्या आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police Station) अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.13) रात्री नऊच्या सुमारास विश्रांतवाडी येथील सरस्वती एंन्टरप्रायजेस येथे घडली आहे. (Robbery In Pune)

याबाबत रामनिवास शिवारामजी देवासी (वय-24 रा. कळस, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन आदित्य लोखंडे (वय-20 रा. विश्रांतवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी 392, 504, 506 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या दुकानात येवून दारु पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने शिवीगाळ करुन दमदाटी केली. तसेच जवळचा लोखंडी कोयत्याचा धाक दाखवला. दुकानातील गल्ल्यातील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेवून पळून गेला. देवासी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

दगडाने रिक्षाची तोडफोड
मुंढवा : नातवाला रिक्षातून घेऊन जात असताना नातू ओळखत असलेल्या चार जणांनी रिक्षावर दगड मारुन काच फोडून नुकसान केले. हा प्रकार बुधवारी (दि.13) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मुंढवा भागातील म्हसोबा चौक, भिमनगर येथे घडला आहे. याप्रकरणी भिमा तुकाराम भिसे (वय-63 रा. भिमनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून गौरव गालफाडे याच्यासह इतर चार मुलांवर आयपीसी 141,143, 147,149, 427 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Pune Parvati Crime | पुणे : खाऊ देण्याच्या बहाण्याने सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

Related Posts