IMPIMP

Robbery On Konark Express | कोणार्क एक्सप्रेसवर दरोडा ! चोरट्यांनी सिग्नल कट करुन 2 महिलांचे दागिने लुटले, हल्ल्यात तरुण जखमी

by nagesh
Robbery On Konark Express | Robbery on konark express train between pune to daund railway route solapur youth injured

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Robbery On Konark Express सिग्नल कट केल्याने थांबलेल्या कोणार्क एक्सप्रेसवर तिघा चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करुन खिडकीतून दोघा महिलांच्या गळ्यातील सव्वा लाखांचे मंगळसुत्र व साखळी हिसकावून नेली. या चोरट्यांना पकडण्यासाठी खाली उतरलेल्या एका निवृत्त रेल्वे कर्मचार्‍याचा मुलगा चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. ही घटना पुणे-दौंड रेल्वेमार्गावरील (Pune-Daund Railway) नानविज फाट्याजवळ रात्री पावणे नऊ वाजता (Robbery On Konark Express) घडली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

विनायक श्रीराम (वय २७, रा. सोलापूर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणार्क एक्सप्रेस (Konark Express) रात्री साडेसात वाजता पुणे रेल्वे स्टेशनवरुन (Pune Railway Station)सुटली. रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ती नानजीव फाटा येथे आली. तिला सिग्नल न मिळाल्याने ती थांबली होती. यावेळी अंधारातून तिघे चोरटे पुढे आले. त्यांनी एस ४ या डब्यात खिडकीत बसलेल्या महिलेल्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र हिसकावले. तिने आरडाओरडा करताच चोरटे पुढे (Robbery On Konark Express) पळाले. त्यांनी एस – १ डब्यात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली. बहिणीची चैन हिसकाविल्याचे पाहिल्यावर विनायक श्रीराम हे खाली उतरले. त्यांनी चोरट्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. (Robbery On Konark Express) तेव्हा चोरट्यांनी रेल्वमार्गावरील दगड उचलून त्यांना मारले. त्यात ते जखमी झाले़ चोरटे अंधारात पळून गेले.

विनायक श्रीराम हे निवृत्त रेल्वे कर्मचार्‍यांचे चिरंजीव आहेत. ते बहिणीसह सोलापूरला (Solapur) चालले होते.
त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर गाडी सोलापूरला रवाना झाली आहे.
दौंड रेल्वे पोलिसांनी (Daund Railway Police)जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक युवराज कलबुर्गी (API Yuvraj Kalburgi) तपास करीत आहेत.

 

Web Title: Robbery On Konark Express | Robbery on konark express train between pune to daund railway route solapur youth injured

 

हे देखील वाचा :

WhatsApp Payment साठी ‘हे’ काम करणे आवश्यक; होणार मोठा बदल, जाणून घ्या

Pradhan Mantri Jan Arogya Yojana | 1.5 लाख हेल्थ अँड वेलनेस सेंटर उघडणार, कॅन्सर-डायबिटीज सारख्या गंभीर आजारांवर होणार उपचार

Aadhaar Card | तुमचा सुद्धा बदलला असेल पत्ता तर अशाप्रकारे बदला, ‘या’ 21 कागदपत्रांचा करू शकता वापर; जाणून घ्या

 

Related Posts