IMPIMP

WhatsApp Payment साठी ‘हे’ काम करणे आवश्यक; होणार मोठा बदल, जाणून घ्या

by nagesh
WhatsApp Payment | identity verification is now required for whatsapp payment know in details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था व्हॉट्सअ‍ॅप सतत इतर पेमेंट्स कंपन्यांच्या (WhatsApp Payment) स्पर्धेचा मुकाबला करण्यासाठी अ‍ॅपमध्ये वेगवेगळे बदल करत असतो. आता व्हॉट्सअ‍ॅपने Identity Verification चं फीचर आणण्याची तयारी सुरु केली आहे. भारतातील इतर ऑनलाइन पेमेंट (WhatsApp Payment) कंपन्या युजर्सला Identity Verification करण्यास सांगत आहे. व्हॉट्सअ‍ॅपने भारतात 2020 मध्ये ही सेवा सुरु केली होती.

व्हॉट्सअपने जून 2021 मध्ये भारतात पेमेंट सेवेची (WhatsApp Payment) सुरुवात सर्वांसाठी लागू केली होती. यानंतर व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटला पेटीएम (Paytm), फोन पे (Phone Pay), गुगल पे (Google Pay) आणि अ‍ॅमेझॉन पे (Amazon Pay) च्या स्पर्धेचा सामना करावा लागला होता. आता त्याच पार्श्वभूमीवर Identity Verification आणण्याचा निर्णय व्हॉट्सअ‍ॅपने घेतला आहे. या निर्णयामुळे युजर्सला हे अ‍ॅप वापरण्यापूर्वी Identity Verification करणं गरजेचं आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सध्या व्हॉट्सअ‍ॅपची ही पेमेंट सेवा भारत आणि ब्राझीलमध्ये उपलब्ध आहे. भारतात फक्त बँकेशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि डेबिट कार्डद्वारे या अ‍ॅपवर पेमेंट करता येते. याशिवाय ब्राझीलमध्ये युजर्सला फेसबुक आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करता येत आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या एका अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे.
या अहवालामध्ये Whatsapp v2.21.22.6 च्या बीटा सॉफ्टवेअरमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
हे Identity Verification त्याच युजर्ससाठी असेल जे व्यावसायीक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणार आहेत.
त्यामुळे युझर्सला सुरक्षितपणे पेमेंट करता येईल, असा अंदाज लावला जात आहे.
तसेच व्हॉट्सअ‍ॅपची ही सेवा आता इतर काही देशात सुरु होण्याची शक्यता आहे.

 

1 नोव्हेंबर पासून व्हॉट्सअ‍ॅप बंद होणार

दरम्यान भारतात व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या कोटीच्या घरात आहे.
हे सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप असून चॅटिंगपासून ते अनेक कार्यालयीन कामांसाठी याचा वापर केला जातो. मात्र काही स्मार्टफोन (smartphone) युजर्सला 1 नोव्हेंबर पासून व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही.
काही विशिष्ट स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा बंद (discontinued) करण्यात येणार आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

Web Title: WhatsApp Payment | identity verification is now required for whatsapp payment know in details

 

हे देखील वाचा :

Pradhan Mantri Jan Arogya Yojana | 1.5 लाख हेल्थ अँड वेलनेस सेंटर उघडणार, कॅन्सर-डायबिटीज सारख्या गंभीर आजारांवर होणार उपचार

Aadhaar Card | तुमचा सुद्धा बदलला असेल पत्ता तर अशाप्रकारे बदला, ‘या’ 21 कागदपत्रांचा करू शकता वापर; जाणून घ्या

Pune News | रस्ते, पदपथांच्या कामाने ‘कफ्फलक’ झाली स्मार्ट सिटी कंपनी; एटीएमएसचे‘ 58 कोटी रुपयांचे’ ‘दायित्व’ आता पुणेकरांच्या खिशावर

 

Related Posts