IMPIMP

Sanjay Kakade | संजय काकडे प्रचारात सक्रिय, म्हणाले ”पुण्याची जागा आम्हीच जिंकणार”, मुरलीधर मोहोळांचे बळ आणखी वाढले

by sachinsitapure

पुणे : Sanjay Kakade | पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) हा भाजपचा (BJP) बालेकिल्ला असून यावेळीही आम्ही पुणे लोकसभेची जागा सहजसहजी जिंकू, असा विश्वास भाजपा नेते, माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला आहे. पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार (Mahayuti BJP Candidate) मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारार्थ कोथरूडमध्ये काढलेल्या प्रचारफेरीत (Kothrud Pracharferi) संजय काकडे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. उमेदवारीसाठी इच्छूक असलेले काकडे नाराज असल्याची चर्चा होती, मात्र, आज त्यांनी मोहोळांच्या प्रचारात सक्रिय होत, चर्चेवर पडदा पाडला आहे. यामुळे मोहोळांची ताकद आणखी वाढल्याचे दिसत आहे.

पुणे लोकसभेचे भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात महायुतीमधील सर्व घटकपक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कायकर्ते सहभागी होत आहेत. मात्र, यामध्ये भाजपा नेते संजय काकडे यांची उणीव भासत होती. काल ते कोथरूडच्या प्रचारफेरीत सहभागी झाल्याने ही उणीव देखील भरून निघाली आहे.

संजय काकडे हे पुणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी इच्छूक होते. परंतु, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यामुळे काकडे थोडे नाराज होते. हिच नाराजी दूर करण्यासाठी मध्यंतरी भाजपा नेते आशिष शेलार यांनी काकडेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट देखील घेतली होती.

पुण्यातील राजकीय गणित मांडण्यात तज्ज्ञ असलेले भाजप नेते संजय काकडे आता मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. काकडे यांच्या सहभागामुळे मोहोळ यांच्या मताधिक्क्यात आणखी वाढ होणार आहे.

दरम्यान, कोथरूड येथील प्रचारफेरीत सहभागी झालेले संजय काकडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, माझे जे काही मुद्दे होते ते पुणे शहर अध्यक्षांपासून राज्यातील आणि देशाच्या नेत्यांपर्यंत पोहोचवले आहेत.

प्रचारात ३० एप्रिलनंतर सहभागी होणार असल्याचे सांगितले होते, त्याप्रमाणे सक्रिय झालो आहे. दहा वर्षांपासून पुणे लोकसभा हा भाजपचा बालेकिल्ला झाला असून यावेळीही पुणे लोकसभेची जागा आम्ही सहजासहजी जिंकू, असा विश्वास संजय काकडे यांनी व्यक्त केला.

Bibvewadi Pune Crime News | पुणे : वाहन तोडफोड प्रकरणात बिबवेवाडी पोलिसांकडून चार जणांना अटक (Video)

Related Posts