IMPIMP

Shiv Bhojan Thali | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी मोफतच मिळणार

by nagesh
Shiv Bhojan Thali | shiv bhojan thali will be provided free of cost Collector Dr. Rajesh Deshmukh

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडी सरकारकडून मोफत शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali) सुरु करण्यात आली आहे. मोफत शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali) मिळण्याचा मंगळवार (दि.14 सप्टेंबर) हा शेवटचा दिवस होता. मात्र आता कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर नागरिकांना यापुढील काळातही मोफत (free of cost) शिवभोजन थाळी मिळणार आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरामध्ये 37 केंद्रांवर दररोज 6038 थाळ्या उपलब्ध करुन देण्यात येत असून नागरिकांना या थाळ्यांसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच आगामी काळात केंद्रांची संख्या वढवण्याचा प्रस्ताव असून, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीकडून याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

 

शिवभोजन थाळी मोफत मिळण्याचा 14 सप्टेंबर हा दिवस शेवटचा दिवस होता.
राज्य सरकारने (State Government) पुढील आदेश येईपर्यंत शिवभोजन थाळी मोफत देण्याच्या सूचना केल्या आहेत.
त्यानुसार नागरिकांना यापुढील काळातही मोफत थाळी मिळणार आहे.
राज्य सरकारने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून (Republic Day) या योजनेची सुरुवात केली होती. सुरुवातील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात 14 ठिकाणी शिवभोजन थाळी योजना सुरु करण्यात आली होती. याला वाढता प्रतिसाद पाहून केंद्राची संख्या 14 वरुन 37 करण्यात आली.
या केंद्रांच्या माध्यमातून दररोज 6038 नागरिकांना मोफत थाळी देण्यात येते.
या योजनेचा लाभ मिळण्याची अंतिम मुदत (Deadline) मंगळवार ही होती.
मात्र, आता पुढील आदेश येईपर्यंत ही योजना सुरु राहणार असून राज्य सरकारने शहर
अन्नधान्य वितरण विभागाला (City Food Distribution Department) सूचना दिल्या आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

यासंदर्भात शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढाले (Sachin Dhale) यांनी सांगितले की, शिवभोजन थाळी योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
केंद्र चालकांना प्रत्येक थाळीमागे 40 रुपये अनुदान मिळत आहे. हे अनुदान विभागाकडून केंद्रचालकांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक 15 दिवसांनी जमा केले जाते.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये या योजनेला प्रतिसाद वाढत आहे.
त्यामुळे केंद्रांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर शिवभोजन थाळीचा लाभ दिला जातो.
या थाळीमध्ये 30 ग्रॅमच्या दोन चपात्या, 100 ग्रॅम भाजी, 100 ग्रॅम भात आणि 100 ग्रॅम वरण नागरिकांना देण्यात येते.
राज्य सरकारने या योजनेची मुदत वाढवली आहे.
नागरिकांना 37 केंद्रावर मोफत थाळी दिली जाणार आहे, असे सचिन ढोले यांनी सांगितले.

 

Web Title : Shiv Bhojan Thali | shiv bhojan thali will be provided free of cost Collector Dr. Rajesh Deshmukh

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | लागोपाठ 6 व्या दिवशी स्वस्त झालं सोनं, आता 27718 रुपयात मिळतंय 10 ग्रॅम, जाणून घ्या नवीन दर

23 वर्षीय शेजारीण माझ्या पतीला ‘अंडरगारमेंट्स’ दाखवते, 42 वर्षीय महिलेने पोलिसांकडे ‘ही’ मागणी; अधिकारी हैराण

Gauhati High Court | उच्च न्यायालयाचा निर्णय ! ‘मुस्लिम व्यक्तीनं हिंदू स्त्रीसोबत केलेला दुसरा विवाह अवैध’

 

Related Posts