IMPIMP

Uddhav Thackeray Sabha In Warje Pune | सत्तेसाठी वखवखलेला औरंगजेबच्या गुजरातमधील ‘वखवखलेला’ आत्मा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात फिरत आहे; छत्रपतींच्या स्वाभीमानी महाराष्ट्रातील जनता त्याचे स्वप्न पूर्ण होउ देणार नाही, उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

by sachinsitapure

पुणे : Uddhav Thackeray Sabha In Warje Pune | सत्तेसाठी वखवखलेला आत्मा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात फिरत आहे. 350 वर्षांपुर्वी गुजरातमध्ये जन्मलेला औरंगजेब महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी २७ वर्षे तळ ठोकून होता. परंतू स्वाभीमानी छत्रपतीं शिवरायांनी आणि मावळ्यांनी त्याचे स्वप्न पूर्ण होउ दिले नाही. आजही औरंगजेबाचा वखवखलेला आत्मा महाराष्ट्रात फिरत असल्याचा जोरदार टोला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लगावतानाच महाराष्ट्राचा स्वाभीमान, अस्मिता राखण्यासाठी मोदी यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी तमाम मराठी जनतेने वज्रमूठ महाविकास आघाडीच्या मागे उभी करावी असे आवाहन केले.

बारामती मतदार संघाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारार्थ वारजे येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, Congress चे प्रदेशअध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), अनिल देशमुख (Anil Deshmukh), मदन बाफना, सचिन आहीर, खासदार सुप्रिया सुळे, चंद्रकांत मोकाटे, डॉ. जयदेव गायकवाड, कुमार गोसावी, संजय जगताप आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, उद्या एक मे आहे, महाराष्ट्र दिन. आपल्याला शपथ घ्यावी लागेल महाराष्ट्राची लूट होतेय, अस्मिता पायदळी तुडवली जात आहे, महाराष्ट्र हुकुमशाहाच्या ताब्यात जावून देणार नाही. सुप्रिया तुझे कौतुक करायला पाहीजे. तु मुलगी म्हणून तू पहाडासारखी वडीलांसोबत उभी राहीली याचा मला अभिमान आहे. काल पुण्यात सभा झाली. ठिकाण योग्य होत. रेसकोर्स. कारण त्यांना झोपेतही घोडेबाजारच दिसतो. त्यांना सांगायला हवे हे घोडे वेगळे आहे आणि तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतले ती खेचरं आहेत. मला भाजप व मोदींची किव येते. त्यांच्यासोबत माझ्याही सभा झाल्यात. २०१४ व २०१९ ला माझा उल्लेख लहान भाउ म्हणून केला. त्यावेळी त्यांना एवढ्या वेळा महाराष्ट्रात येण्याची गरज पडली नव्हती. आता का पडली. त्यांची भाषा किती खाली गेली आहे. काल ते शरद पवारांना भटकती आत्मा बोलले. मी आणि शरद पवार आमच्या मुलांसाठी लढत आहोत. मुख्यमंत्री व्हायला लोकांची मते लागतात. एका फोनवर मुलाला बीसीसीआयचे अध्यक्षपद देण्याइतके सहज आहे का ते.

सत्तेसाठी वखवखलेल्या मोदी यांच्या आत्म्याला संवेदना असतील तर तुमच्या नादानपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांकडे,त्यांच्या हिरावलेल्या मंगळसूत्राकडे पहा. महाराष्ट्र गद्दार नाही. कृतज्ञ नाही. शूरांना वंदन करण्याची परंपरा आहे. भाजपचे चोरा मी वंदीले सुरू आहे. मोदींना माहिती असेल का नसेल, ३५० वर्षांपुर्वी गुजरातमध्ये जन्मलेला वखवखलेला आत्मा महाराष्ट्रात आला. २७ वर्षे येथे राहीला. लढवय्या छत्रपतींमुळे त्यांचे स्वप्न पुर्ण होउ शकले नाही. आजही त्या औरंगजेबाचा आत्मा वखवख करत फिरत आहे.

आघाडी सरकारने शेतकर्‍यांची दोन लाखांची कर्जमुक्ती केली. आम्ही सोयाबीन, कापसाला भाव दिले. परंतू भाजप घटना बदलायला निघालेत. चारशे पार वरून भटकती आत्म्यावर आलेत. देशाची घटना बदलण्यामागे महाराष्ट्र द्वेष आहे. कारण ती महाराष्ट्राच्या दलित कुटुंबात जन्मलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध आहे. महाराष्ट्राच्या सुपुत्राने केलेली घटना बदलायला हात लावला तर संपुर्ण देश पेटेल. धनगर, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी संसदेचे अधिवेशन घ्या अशी आम्ही मागणी करत आहोत. परंतू ते घेत नाही. जीएसटीच्या माध्यमातून व्यापार्‍यांच्या मोठी पिळवणूक होत आहे.

जीडीपी वाढलाय म्हणतात. मला नंतर कळल गॅस, डिझेल आणि पेट्रोल वाढले. जगातला सर्वात मोठा इलेक्टोरोल घोटाळा यांच्या काळात झालाय. खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने त्याला मोदी गेट घोटाळा म्हणताहेत. मोदी म्हणतात सत्तर वर्षात जे कॉंग्रेसने केले नाही, ते मी अडीच वर्षात केले. भाजपच्या खात्यात दहा हजार कोटी रुपये आले. अशा या लुटारूंना महाराष्ट्र कधीच साथ देणार नाही. येत्या निवडणुकीत भाजपा तडीपार होणारच. इंडिया आघाडीचे तीनशेच्यावर खासदार निवडूण येणारच.

बारामती मतदार संघात जे घडले ते फार क्लेषदायक आहे. धंगेकर यांनी एक चमत्कार करून दाखवला आहे. आता मोठा चमत्कार करून दाखवायचा आहे. शिरूर, मावळ, सातारा हा सगळा पट्टा मशाल, तुतारी आणि पंजाच आला पाहीजे.

शरद पवार म्हणाले, काल पंतप्रधान महाराष्ट्रात होते. चांगली गोष्ट आहे तरुणांमध्ये नोकरीबाबत अस्वस्थता आहे. दरवर्षी दोन कोटी नोकर्‍या निर्माण करू असे आश्‍वासन दिले होते. हे आश्‍वासन ते पुर्ण करू शकले नाही. सत्तेचा वापर करून विरोधकांना अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शिक्षण आणि आरोग्य सेवेमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणत लोकांना चांगली सेवा उपलब्ध करून दिली. त्यांना जेलमध्ये टाकले. देशात बदल घडवण्याची जबाबदारी आता जनतेवर आहे. जनतेने सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर, डॉ. अमोल कोल्हे आणि संजोग वाघेेरे यांना मोठया मताधिक्याने संसदेत पाठवा.

नाना पटोले, म्हणाले मागील दहा वर्षात केंद्रात तानाशाही व्यवस्था आली त्यांनी संविधान संपवण्याचे काम केले. शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राने या सरकार विरोधात यल्गार पुकारले. जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. भाजप आणि त्यांच्यासोबत गेलेल्यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी जनता आसुसली आहे, हे निकालातून दिसून येईल. खोक्याचे सरकार राज्यात आल्यानंतर सगळे उद्योग गुजरातला पळविले. महाराष्ट्राच्या कांद्याची निर्यात बंद केली आणि गुजरातच्या कांदा निर्यातीला परवानगी दिली. पंतप्रधान गुजरातचे आहेत का? गुजरात मार्गे आलेल्या ड्रग्ज राज्यात विकून येथील युवा पिढी बरबाद करत असतील तर महाराष्ट्र कधी हे होउन देणार नाही.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपली लढाई व्यक्ति विरोधात नाही, महाराष्ट्राच्या विरोधातील लोकांविरोधात आहे. महागाई, बेरोजगारी वाढतेय, आयआयटीतील मुलांना नोकर्‍या मिळत नाही. ज्या अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराविरोधात आरोप करत होते, त्यांच्या विरोधात मी संसदेत लढत होते. परंतू आज त्यांना सहा वर्षे खासदार करण्यात आले आहे. हीच भाजपची भ्रष्टाचारा विरोधातील लढाई आहे? आमच्या सोबत अनेक वर्षे होते ते आता भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी विरोधात काही बोलत नाहीत. भाजपने आमच्यातील भ्रष्टाचारी साफ केल्याबद्दल त्यांचे आभार मानते.

आम्हाला नकली सेना म्हणता तर आता नॅशनल करप्ट पार्टी (एनसीपी) कशी चालते

माझ्या वडीलोपार्जीत शिवसेनेला नकली सेना म्हणाले, त्यांच्यासोबत गद्दारांची टोळी आहे. त्याला शिवसेना मानता. हा नियम लावला तर ज्या एनसीपीला नॅशनल करप्ट पार्टी म्हणालात ते आता तुमच्या सोबत आहेत. ती कशी चालते. शिवसेनेने तुम्हाला कठीण काळात मदत केली म्हणून तुम्ही पंतप्रधान झालात. ती तुम्ही संपवायला निघालात. भारतातील सर्वात मोठं सेक्स स्कँडल करणार्‍या देवेगौडा यांच्या नातवाचा प्रचार करताहेत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी मोदींना लगावला.

Lok Sabha Election 2024 | निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची दुसरी सरमिसळ संपन्न

Related Posts