IMPIMP

Lok Sabha Election 2024 | निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची दुसरी सरमिसळ संपन्न

by sachinsitapure

पुणे : Lok Sabha Election 2024 | लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मावळ (Maval Lok Sabha), पुणे (Pune lok Sabha) आणि शिरुर मतदारसंघात (Shirur Lok Sabha) नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची विधानसभा मतदारसंघ क्षेत्रनिहाय दुसरी सरमिसळ निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली.

यावेळी मावळ मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदीती राजशेखर , पुणे मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक प्रसाद लोलयेकर, शिरुर मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक कुमार सौरभ राज, जिल्हाधिकारी तथा पुणे मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुहास दिवसे (Suhas Diwase), मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला (Deepak Singla IAS), शिरुर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे (Ajay More), मनुष्यबळ समन्वयक अधिकारी ज्योती कदम (Jyoti Kadam) आदी उपस्थित होते.

मावळ मतदारसंघातील पुणे जिल्ह्यांतर्गत तीन विधानसभा क्षेत्रातील १ हजार ३३९ मतदान केंद्रासाठी ६ हजार ५९४ आणि रायगड जिल्ह्यांतर्गत तीन विधानसभा क्षेत्रातील १ हजार २२७ मतदान केंद्रासाठी ५ हजार ४४८, पुणे लोकसभा मतदारसंघाच्या २ हजार १८ मतदान केंद्रासाठी ११ हजार १७६ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील २ हजार ५०९ मतदान केंद्रासाठी ११ हजार ५८६ अधिकारी-कर्मचाऱ्यांची सरमिसळ संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात आली.

या सरमिसळ प्रक्रीयेच्या माध्यमातून संबंधित विधानसभा क्षेत्रातील पथक निश्चित झाले असून विधानसभा क्षेत्रस्तरावरील दुसऱ्या सरमिसळ प्रक्रीयेत मतदान केंद्रासाठी पथक निश्चित होईल.

Aranyeshwar Pune Crime | पुणे : चेष्टामस्करीत तरुणाला पेट्रोल टाकून पेटवले, दोघांवर FIR

Related Posts