IMPIMP

Warje Malwadi Pune Crime News | पुणे: प्लॉटच्या विक्रीच्या बहाण्याने 11 लाखांची फसवणूक; 2 महिलांविरुध्द गुन्हा दाखल

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे : – Warje Malwadi Pune Crime News | प्लॉट विक्रीची आकर्षक जाहिरात प्रसिद्ध करुन एका दाम्पत्याची 11 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2010 ते जून 2024 या कालावधीत पुण्यातील अतुलनगर येथे घडला आहे. आरोपी महिलांनी मावळ तालुक्यातील मोरवे गावातील भुखंड देण्याचे आमिष तक्रारदार यांना दाखवले.

याबाबत अजय रंजीत दयाल (वय-58 रा. रविवारज हेरीटेरीज, भाऊ पाटील रोड, बोपोडी, पुणे) यांनी बुधवारी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनिषा वसंत वाकडे, दिपा वसंत वाकडे (रा. वुड्स रॉयल, कोथरुड) यांच्यावर आयपीसी 420, 419, 406, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मावळ तालुक्यातील मौजे मोरवे येथील जमिनीवर कात्यायानीज उपवन या नावाने फार्म हाऊस करता प्लॉट विक्री करण्याचा प्रकल्प सुरु केला. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून पुणे व शहर परिसरात आकर्षक जाहिरात प्रसिद्ध केली. ही जाहिरात पाहून फिर्य़ादी यांनी ऑगस्ट 2010 मध्ये या प्रकल्पातील फेज दोन मधील एक चौरस मीटरचा भुखंड खरेदी करण्याची तयारी दाखवली. आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन प्लॉट विक्री करण्याच्या बहाण्याने 11 लाख 65 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी अद्यापपर्यंत प्लॉट नावावर करुन न देता तसेच घेतलेले पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts