IMPIMP

Suicide in Karmala | करमाळ्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

by nagesh
Wardha Crime | partially burnt body of woman was found in satyagrahi ghat wardha possibility of attack

करमाळा (Karmala): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Suicide in Karmala | सासरच्या लोकांकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून जावयाने आत्महत्या (Suicide in Karmala) केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील (Solapur district) करमाळा येथे घडली आहे. पत्नीला नांदायला न पाठवणे, जमीन नावावर करुन देण्यासाठी सासरच्या लोकांनी लावलेला तगादा अशा अनेक कारणातून मानसिक छळ केल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Karmala) केली. याप्रकरणी पत्नीसह सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अभिजित कांतीलाल घोगरे Abhijit Kantilal Ghogre (वय-32 रा. सरपडोह ता. करमाळा) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अभिजित याचा मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांसाठी पत्नी आणि सासरचे लोक शारीरिक, मानसिक छळ (Mental torture) करत होते. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी कोणतेही कारण नसताना घर सोडून माहेरी गेली. अभिजितने तिला अनेकवेळा घरी येण्याची विनंती केली. परंतु सासरच्या लोकांनी तिला नांदवण्यास पाठवले नाही.

 

 

याशिवाय, जमीन (Land) पत्नीच्या नावावर करुन देण्याचा तगादा लावला.
यासाठी तरुणावर मानसिक दबाव टाकला जात होता.
तसेच सासरच्या लोकांनी अभिजितकडून घराचे बांधकाम (Construction) करुन घेतले परंतु त्याचे पैसे परत केले नाहीत.
सासरच्या लोकांकडून अशा प्रकारे त्रास होत असल्याने अभिजित याने टोकाचे पाऊल उचलत घरातील लोखंडी नळीला ड्रीपच्या पाईपने (drip pipe) गळफास घेऊन आत्महत्या (commits suicide) केली.

 

 

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.
याप्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर पोलिसांनी पत्नीसह सासरच्या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title : Suicide in Karmala | son in law commits suicide after being harassed by
wife and in law family karmala solapur

 

हे देखील वाचा :

Maharashtra Government | आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केट्समध्येही मिळणार ‘वाइन’; राज्य सरकारचं नवं धोरण लवकरच

Shikrapur News | कंपनीतील कामाच्या पैशाच्या वादातून एकाला मारहाण, 2 जणांवर FIR

Corona Vaccination | 100 % लसीकरण पूर्ण करणारे भुवनेश्वर ठरले देशातील पहिले शहर

 

Related Posts