IMPIMP

ACB Trap News | लाच स्वीकारताना महावितरण कंपनीचा कनिष्ठ अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

by sachinsitapure
ACB

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap News | विद्युत कनेक्शन देण्याकरिता इस्टिमेट तयार करून पुढील कार्यवाही करण्यासाठी दोन हजार रुपये लाच स्वीकारताना महावितरण कंपनीचा (MSEDCL) कनिष्ठ अभियंता साईनाथ नामदेव सनगर Junior Engineer Sainath Namdev Sangar (वय 40 सध्या रा. प्लॉट नं – 90, शिवपार्वती नगर, कराड नाका जवळ, पंढरपूर) याला सोलापुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि.11) करण्यात आली.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याप्रकरणी 39 वर्षीय व्यक्तीने सोलापूर एसीबी कार्यालयात (ACB Trap News) तक्रार दिली आहे. तक्रारदार हे विद्युत ठेकेदार (Electrical Contractor) आहेत. त्यांना इंडस टॉवर, प्रा. लि. (Indus Tower, Pvt. Ltd.) या कंपनीकडून नेमतवाडी पंढरपूर येथील एअरटेल मोबाईल कंपनीच्या (Airtel Mobile Company) टॉवरवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम मिळाले आहे. सदर ट्रान्सफॉर्मर च्या विद्युत कनेक्शनकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, यांची परवानगी आवश्यक होती. यासाठी तक्रारदार यांनी महावितरण कंपनी, पंढरपूर ग्रामीण 2 येथे अर्ज दाखल केला होता. या अर्जावरून इस्टिमेट तयार करून पुढील कार्यवाही करिता उप कार्यकारी अभियंता यांच्याकडे सादर करण्याकरिता कनिष्ठ अभियंता साईनाथ सनगर याने तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी सोलापूर एसीबीकडे याबाबत तक्रार केली.

सोलापूर एसीबीच्या पथकाने (Solapur ACB) पडताळणी केली असता कनिष्ठ अभियंता साईनाथ सनगर यांनी
तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले.
यावरून पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना (Accepting Bribe) सनगर याला
रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे
(Addl SP Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार
(DySP Ganesh Kumbhar), पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक (PI Umakant Mahadik),
पोलीस अंमलदार स्वामीराव जाधव, अतुल घाडगे, सलीम मुल्ला, राहुल गायकवाड यांच्या पथकाने केली.

Related Posts