IMPIMP

पोटगी प्रकरणात न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल ! पतीच्या कमाईवर पत्नी, मुलांसह आई-वडिलांचाही अधिकार

by amol
Pune Court | Keshav Argade granted bail in Khadakwasala hotel shooting case

दिल्ली : – न्यायालयाने एका पोटगी Alimony प्रकरणात महत्वाचा निकाल दिला आहे. कोणत्याही व्यक्तीच्या उत्पन्नावर फक्त त्याची पत्नी, मुल यांचाच अधिकार असतो, असे नाही तर त्यांच्या वृद्ध आई वडिलांचा देखील वाटा असतो. त्याच्या कमाईचा त्यांनाही लाभ द्यायला हवा. पत्नी आणि मुलांच्या बरोबरीने कोणत्याही व्यक्तीच्या कमाईवर त्याच्या आई वडिलांचा अधिकार असतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. दिल्लीतील तीस हजारी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गिरीष कथपालिया यांनी न्यायालयात या प्रकरणी सुनावणी केली आहे.

महिलेचे म्हणणे होते की, आपल्या पतीचे दरमहा उत्पन्न 50 हजार रुपयापेक्षा जास्त आहे. तरीही तिच्या मुलांना आणि तिला फक्त 10 हजार रुपये पोटगी दिली Alimony जाते. त्यामुळे जास्त पोटगीची मागणी केली होती. यावर पतीने प्रतिज्ञापत्र जाहीर करताना म्हटले होते की, माझे मासिक उत्पन्न 37 हजार रुपये आहे. या रक्कमेतून पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलाचा सांभाळ करण्याशिवाय वृद्ध आई वडिलांची काळजी घ्यावी लागते. न्यायालयाने पतीच्या प्रतिज्ञापत्रानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांना रिपोर्ट सादर करायला सांगितले होेते. अधिकाऱ्यांनी रिपोर्टमध्ये सांगितले होते की, पतीने योग्य कागदपत्रे सादर केली आहेत. त्याच्या आयकर खात्यानुसार उत्पन्न 37 हजार आहे. तसेच रिपोर्टमध्ये त्याच्यावर आई वडिलांची जबाबदारी असून त्यांच्या आजारपणाचा खर्चही पतीकडून केला जातो. न्यायालयाने या रिपोर्टला गांभीर्याने घेतले आहे. दरम्यान न्यायालयाने या प्रकऱणी सुनावणी करताना पतीच्या उत्पन्नाची विभागणी 6 भागात केली. यातील दोन भाग पतीला, तर पत्नी, मुलगा आणि आई-वडिल यांना प्रत्येक एक भाग द्यावा. पत्नी आणि मुलाच्या वाट्याला यामध्ये 12 हजार 500 रुपये येतात. आता दर महिन्याच्या दहा तारखेला पत्नी आणि मुलाला पोटगीची Alimony रक्कम द्यावी असे न्यायालयाने पतीला सांगितले आहे.