IMPIMP

महाराष्ट्रातील ‘त्या’ 4 आत्महत्यांमुळे ठाकरे सरकार येणार का अडचणीत ?

by amol
Uddhav Thackeray

मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार Thackeray government सत्तेवर आल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आले होते. त्यानंतर त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

तसेच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. या प्रकरणाची चौकशी सुरु होती. मात्र, त्यातच या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदरजवळ आढळला. हिरेन यांनी आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. मात्र, मनसुख हिरेन हे आत्महत्या करणार नाहीत, असा दावा कुटुंबियांनी केला. याच मुद्यावरून राजकीय वातावरण तापले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तपास अधिकारी सचिन वाझे यांच्यावर शंका उपस्थित केली. तसेच मनसुख यांचा मृतदेह आढळला तेव्हा त्यांच्या शरीरावर कोणतीही खून आढळली नाही. ते पोलिसांना चौकशीत सहकार्य करत होते, असे कुटुंबियांनी सांगितले.

दिशा सालियान या तरुणीने मालाड येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. या मुलीवर बलात्कार झाल्याचा दावा विरोधकांनी केला. एका पार्टीत या मुलीसोबत अत्याचार झाला. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती, असेही म्हटलं होते. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला दिशा सालियान हिच्या मृत्यूबाबात सर्व काही माहीत होतं असे सांगण्यात आले आहे.

सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केल्याचे सुरुवातीला म्हटले जात होते. मात्र, कालांतराने अनेक धागेदोरे पुढे आले आहेत. त्यानंतर ठाकरे सरकारमधील Thackeray government एका मंत्र्याचा यामध्ये सहभाग असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

पूजा चव्हाण, मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारला Thackeray government धारेवर धरले. त्यांनी राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर सवाल उपस्थित करत तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान, राज्यातील दिशा सालियान, सुशातसिंह राजपूत, पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन या सर्वांच्या मृत्यूमागे आत्महत्या की हत्या याचा संशय विरोधकांनी व्यक्त केला आहे. मात्र, सर्वाधिक चर्चेत असलेल्या या 4 प्रकरणांचे रहस्य सोडवणे हे आता पोलिसांसमोर आव्हान आहे.

Related Posts