IMPIMP

Vasu Paranjape | भारताने ‘द्रोणाचार्य’ गमावला; जेष्ठ प्रशिक्षक वासू परांजपे यांचं निधन

by nagesh
Vasu Paranjape | cricket coach vasoo paranjape passes away

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Vasu Paranjape | प्रसिद्ध प्रशिक्षक आणि क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ प्रशिक्षक वासूदेव परांजपे (Senior Instructor Vasudev Paranjape) यांचं 83 व्या वर्षी निधन (Died) झालं आहे. फलंदाज असो वा गोलंदाज, प्रत्येक खेळाडूचा स्वतंत्र अभ्यास करणारे, त्यानुसार त्याला प्रशिक्षण देणारा व्यक्ती म्हणून वासू परांजपे यांची ओळख होती. बडोदा आणि मुंबईसाठी त्यांनी 29 प्रथम श्रेणी सामने खेळले होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

जेष्ठ प्रशिक्षक वासू परांजपे (Senior Instructor Vasudev Paranjape) यांनी आपल्या कारकीर्दीत सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर ,सचिन
तेंडुलकर, संजय मांजरेकर, सनथ जयसूर्या आणि रोशन महानामा या जगातील महान क्रिकेटर्सना बहुमूल्य मार्गदर्शन केलं आहे.
परांजपे यांच्या प्रशिक्षक कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 2019 मध्ये त्यांचा द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त बुद्धिबळ प्रशिक्षक रघुनंदन गोखले यांच्या हस्ते सन्मान केला गेला.

वासू परांजपे यांना प्रतिभेची अशी नजर होती, की एकदा त्यांनी 14 वर्षीय सचिन तेंडुलकरची मुश्ताक अली यांना ओळख करून दिली.
तेव्हा ते म्हणाले होते, की हा सुनील गावसकरानंतर देशातील दुसरा सर्वोत्तम फलंदाज आहे.

 

Web Title : Vasu Paranjape | cricket coach vasoo paranjape passes away

 

हे देखील वाचा :

Bharatiya Samatawadi Party | भारतीय समतावादी पार्टीच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 15 जणांचा महात्मा बसवेश्वर क्रीडा गौरव पुरस्काराने सन्मान

Gold Price Today | सोन्यातील घसरणीमुळे पुन्हा खरेदीची संधी, जाणून घ्या 10 ग्रॅमचे नवीन दर

Vijay Vadettiwar | ‘दारूची दुकानं सुरू, मंदिरं बंद का? भाजपच्या सवालावर मंत्री वडेट्टीवारांचे उत्तर; म्हणाले…

 

Related Posts