IMPIMP

Gold Price Today | सोन्यातील घसरणीमुळे पुन्हा खरेदीची संधी, जाणून घ्या 10 ग्रॅमचे नवीन दर

by nagesh
Gold Price Today | gold price today gold dropped and silver also dipped gold rate update view details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold Price Today) आज म्हणजे 30 ऑगस्ट 2021 ला घसरण नोंदली गेली. तर, चांदीच्या किमतीत (Silver) सुद्धा आज घट नोंदली गेली. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,588 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.

तर, चांदी 62,313 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती.
अंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा सोन्याचे दर कमी झाले, तर चांदीमध्ये किरकोळ घट नोंदली गेली.

 

 

सोन्याचे नवीन दर

दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात 199 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण नोंदली गेली.
तरीसुद्धा सोने 46 हजार रुपयांच्या स्तरापासून वर बंद झाले.
दिल्ली 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज 46,389 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचून बंद झाला. अंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत कमी होऊन 1,814 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

चांदीचे नवीन दर

चांदीच्या किमतीत सुद्धा आज घट दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचा दर 250 रुपयांच्या घसरणीसह 62,063 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला.
तर, अंतराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात विशेष बदल झाला नाही आणि ती 23.99 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

 

 

सोन्यात का झाली घसरण

एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) चे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, अंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमतीत सतत उलथा-पालथ होत आहे.
न्यूयॉर्क येथील कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा हाजीर भाव (Gold Spot Price) किरकोळ प्रमाणात घसरला.

तर, डॉलरच्या तुलनेत रुपयात आज मजबूती आली.
आज सकाळी रुपया डॉलर (Rupee Vs Dollar) च्या तुलनेत 31 पैशांच्या जबरदस्त मजबूतीसह 73.38 च्या स्तरावर खुला झाला.
तर, डोमॅस्टिक इक्विटीजमध्ये पॉझिटिव्ह ट्रेंड दिसून आला.
यामुळे सोन्याच्या किमती दबावात आल्या.

 

Web Title : Gold Price Today | gold price today gold dropped and silver also dipped gold rate update view details

 

हे देखील वाचा :

Vijay Vadettiwar | ‘दारूची दुकानं सुरू, मंदिरं बंद का? भाजपच्या सवालावर मंत्री वडेट्टीवारांचे उत्तर; म्हणाले…

Anti Corruption | 1.20 लाखाची लाच घेताना तहसीलदार आणि शिपाई अँटी करप्शनच्या जाळ्यात

Pune Water Supply | गुरुवारी संपुर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

 

Related Posts