IMPIMP

Rohit Sharma | हिटमॅन रोहित शर्माचा षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड! क्रिस गेलला टाकले मागे, Video

by sachinsitapure
Rohit Sharma

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपच्या (ICC Cricket World Cup 2023) इतिहासात एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्मा क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वात जास्त षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. इतकेच नाही तर रोहित एकमेव फलंदाज आहे ज्याने वन-डे कपच्या इतिहासात षटकारांचे अर्धशतक पूर्ण केले आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आधीच ‘सिक्सर किंग’ बनला आहे आणि विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

रोहित शर्माने क्रिस गेलचा (Chris Gayle) विक्रम मागे टाकत नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. कारण रोहित शर्मा पहिला आणि एकमेव फलंदाज आहे, ज्याने वर्ल्ड कपच्या तीन एडिशनमध्ये ५० किंवा त्यापेक्षा जास्त षटकार मारले आहेत. क्रिस गेलने वर्ल्ड कपच्या ३४ डावांमध्ये ४९ षटकार मारले होते. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल Glenn Maxwell (४३), एबी डिव्हिलियर्स AB de Villiers (३७) व डेव्हिड वॉर्नर David Warner (३७) यांचा क्रमांक येतो.

परंतु रोहित शर्माने २७ व्या डावातच कमाल केली आहे. या यादीत तिसरे नाव ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचे आहे. मॅक्सवेलने आतापर्यंत २३ डावांमध्ये ४३ षटकार ठोकले आहेत.

रोहित शर्माने (Rohit Sharma) क्रिस गेलचा आणखी एक विश्वविक्रम मोडला आहे. रोहित शर्मा एक वर्ल्ड कप एडिशनमध्ये सर्वात जास्त षटकार ठोकणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. क्रिस गेलने २०१५ च्या वर्ल्ड कपमध्ये एकुण २६ षटकार मारले होते.
परंतु रोहित शर्माने न्यूझीलंडविरूद्ध वर्ल्ड कप २०२३ च्या सेमीफायनलमध्ये तिसरा षटकार मारताच त्याच्या
षटकारांची संख्या या आवृत्तीत २७ झाली आणि अशाप्रकारे क्रिस गेलचा विक्रम मोडला.

वन डे वर्ल्ड कपचा हा उपांत्य फेरीचा सामना पाहण्यासाठी महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar),
महान फुटबॉलपटू डेव्हिड बेकहम, सुपरस्टार रजनीकांत आदी मान्यवर उपस्थित होते.

भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव,
रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड – केन विल्यमसन (कर्णधार), डेव्हिन कॉन्वे, रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, मार्क चॅपमॅन,
ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम, मिचेल सँटनर, टिम साउदी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेन्ट बोल्ट.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

Related Posts