IMPIMP

NEMS School Pune | युद्धकला आणि शिवकालीन मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकानी रंगला एन.ई.एम.एस. शाळेचा वार्षिक क्रीडा दिन 850 विद्यार्थांनी घेतला सहभाग

by sachinsitapure
NEMS School Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – NEMS School Pune | लाठी-काठी, भाला कवायत, रणमार कला यासह विविध शारीरिक कवायती आणि व्यायाम प्रकारांचे प्रात्यक्षिक सादर करत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मिडियम स्कूलच्या ८५० विद्यार्थांनी शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा केला. गुरुवारी संध्याकाळी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थांनी उपस्थितांसमोर विविध प्रात्यक्षिके सादर केली. (NEMS School Pune)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

इयत्ता पहिले ते पाचवीच्या विद्यार्थांनी सूर्यनमस्कार, बजरंग जय बैठक सोबत शारीरिक कवायतीची प्रात्यक्षिके सादर केली. सहावी ते दहावीच्या विद्यार्थांनी लाठी-काठी, भाला कवायत, भूमी नमस्कार यांची प्रात्यक्षिके सादर केली. रणमार कला अर्थात लाठीकाठीने प्रत्यक्ष युद्ध कला सादर करणे. इयत्ता १०वी च्या विद्यार्थांनी या कलेचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच लखन गुरुजी आणि त्यांच्या सहकाऱ्यंनी अतिशय चित्तथरारक आणि लक्षवेधी प्रात्यक्षिके सादर केली. (NEMS School Pune)

युद्धकलेचे प्रशिक्षण देणाऱ्या कोल्हापुरच्या सव्यसाची गुरुकुलम् चे प्रधानाचार्य लखन जाधव गुरुजी आणि त्यांच्या सहकार्यांनी विद्यार्थांना युद्धकलेचे धडे दिले. गेले दहा दिवस एन.ई.एम.एस. शाळेतच हे प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी दर वर्षी १० दिवस युद्धकला आणि शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिकाचा सराव चालू ठेवावा असे आवाहन केले. अर्जुन पुरस्कारांनी सन्मानित खोखोपटू सुरेखा द्रविड आणि योगार्जुन पुरस्कार विजेत्या योगपटू पल्लवी कव्हाणे आणि ज्ञानप्रबोधिनी शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद नाईक, एन.डी.ए तसेच डी. ई.एस शाळेचा माजी विद्यार्थी सोहम बाचल हे सर्व कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे होते.

यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, प्रबंधक डॉ सविता केळकर,
एन.ई.एम.एस शाळा समिती अध्यक्ष ॲड. अशोक पलांडे,
काऊन्सिल मेंबर मिलिंद कांबळेआणि संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
एन.ई.एम.एस. शाळेच्या माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रीतम जोशी आणि
प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. शाळेचे शिक्षक,
कर्मचारी आणि विद्यार्थांचे पालक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कुरकेली तर आभार प्रदर्शन रोहिणी मराठे यांनी केले.

Related Posts