IMPIMP

Pune Crime | आरक्षित जमीनीच्या वादातून पंचायत समिती सभापतीने दाखवले पिस्तुल, FIR दाखल

by nagesh
Pune Metro | A shooting took place at the Metro shed during Army training, injuring a Metro employee

पुणे / हिंजवडी (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Pune Crime | एमआयडीसीने (MIDC) आरक्षित केलेल्या जमीनीत सुरु केलेल्या गटार आणि रस्त्याच्या कामाला जमीन मालकाने हरकत घेतल्याने मुळशी पंचायत समितीच्या सभापतीने (Mulshi Panchayat Samiti Chairman) जमीन मालकाला पिस्तुलाचा (pistol) धाक दाखवला. तसेच सभापतीच्या इतर सहा साथिदारांनी बेदम मारहाण करुन डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारुन गंभीर जखमी केल्याची घटना हिंजवडीत (Hinjewadi) घडली आहे.. याप्रकरणी सात जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.4) दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान फेज-2 माण (Phase-2 Maan) येथे घडली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

रोशन बाळकृष्ण ओझरकर (वय-28 रा. ओझरकरवाडी, माळ, ता. मुळशी), नवनाथ आनंदा गवारे उर्फ
गवारी (वय-38 रा. गवारे मळा, माण), नितीन बाळु कुंटे (वय-25 रा. चंदे (लवळे) ता. मुळशी) अशी अटक
करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर पंचायत समिती सभापती पांडुरंग मारुती ओझरकर
(Panchayat Samiti Chairman Pandurang Maruti Ojharkar), गणेश शिंदे, रामदास गवारे,
यशवंत गवारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रामनारायण एकनाथ पारखी (वय-63 रा.
ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, माण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेत सुरज
पारखी आणि विश्वनाथ रामनारयण पारखी हे जखमी झाले आहेत.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनारायण पारखी यांची सर्वे नं.594 मध्ये जमीन आहे. त्यापैकी सर्वे नं. 305 मध्ये पाच एकर जमिनीपैकी तीन एकर जमिन एमआयडीसीने आरक्षित केली आहे. उर्वरीत दोन
एकर जमीन ही फिर्यादी यांच्या सख्ख्या व चुलत भावांच्या नावावर आहे. त्यामधून माण ग्रामपंचायतीच्या
मार्फत गटार रस्ता व इतर कामे केली जात आहेत. या कामांसाठी फिर्यादी यांनी हरकत घेतली आहे.

 

 

हरकत असताना सुद्धा एस.के. एंटरप्रायजेस कडून त्याठिकाणी खोदकाम सुरु केले. या कामाला फिर्यादी
व त्यांच्या भावांनी हरकत घेतली. तसेच पावसाळा संपल्यानंतर यावर निर्णय घेण्याचे ठरले. यानंतर पंचायत
समिती सभापती पांडुरंग ओझरकर यांनी त्यांच्याकडे असलेली रिव्हॉलवर दाखवून शिवीगाळ करत
सिमेंटचा ब्लॉक फिर्यादी यांचा पुतण्या सुरज पारखी याच्या डोक्यात मारुन जखमी केले. तर फिर्यादी यांचा
मुलगा विश्वनाथ याला हाताने मारहाण केली. तसेच आरोपी नितीन कुंटे आणि रोशन ओझरकर यांनी
दगडाने मारहाण केली. तसेच आरोपी रामदास गवारी, नवनाथ गवारे, यशवंत गावारे यांनी संगनमत करुन
अन्य आरोपींना एकत्र बोलावुन घेत रोडवर गाड्या आडव्या लावून त्यांचा रस्ता आडवला. तसेच त्यांना
शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे फिर्यादेत म्हटले आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

त्यानंतर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी भरत रावण पाटील (वय-55 रा. कोथरुड,
पुणे) यांनी महेश रामहरी पारखी, जय रामहरी पारखी, नितीन पारखी, सोमनाथ प्रकाश कसाळे,
रामहरी पारखी, सुरज पारखी विश्वनाथ पारखी यांच्या विरोधात फिर्याद दिली. भरत पाटील यांच्या
फिर्यादीवरुन शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील
तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | FIR filed on Panchayat Samiti Chairman over reserved land dispute

 

हे देखील वाचा :

Modi Government | मोदी सरकार 2.0 साठी खास आहे 5 ऑगस्ट, यावेळी सुद्धा विरोधकांना देणार का आश्चर्याचा धक्का?

Tokyo Olympics | हॉकीतील 4 दशकाचा दुष्काळ समाप्त ! भारताने जर्मनीवर 5-4 ने मात करुन ‘कांस्य’ पटकाविले

Lalbaugcha Raja | गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट! भक्तांनी लालबागच्या राजाचे दर्शन आणि पूजा ऑनलाइन करण्याचे आवाहन

 

Related Posts